Dainik Maval News : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिरात श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी हभप मंगल महाराज जगताप, संतोष महाराज काळोखे, नितीन महाराज काकडे, उद्योजक शंकरराव शेळके, हभप महादुबुआ सातकर उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री पोटोबा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील पारदर्शक कारभार करणारे देवस्थान आहे, असे गौरोवोद्गार हभप बाळासाहेब काशिद यांनी व्यक्त केले. देवस्थानचे अहवालाचे काम पारदर्शक असल्यामुळे वारकरी संप्रदायाने तो आदर्श डोळ्यसमोर ठेऊन आपले पारमार्थिक काम करावे, असे मार्गदर्शक हभप संतोष महाराज काळोखे यांनी व्यक्त केले.
यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. देवस्थानच्या कार्याचा अहवाल आणि पुढील उद्देश देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे यांनी मनोगतामध्ये मांडला.
- याप्रसंगी दत्तात्रय लायगुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, दत्तात्रय लालगुडे, किसनराव खाणेकर, पंढरीनाथ भिलारे, पंढरीनाथ ढोरे, चंद्रकांत ढोरे, गंगाधर ढोरे, भरतशेठ म्हाळसकर, मनोजभाऊ ढोरे, विजयराव जाधव, रविंद्र म्हाळसकर यांसह तालुक्यातील वारकरी, ग्रामस्थ वडगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे, सुनिता कुडे यांनी केले. प्रास्ताविक अनंता कुडे, स्वागत सुभाषराव जाधव, दत्तात्रय महाराज शिंदे, सूत्रसंचालन हभप गणेश महाराज जांभळे यांनी केले. तर आभार नारायणराव ढोरे यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar