व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने बांबू, शेवगा आदी देशी वृक्षांच्या लागवडीसाठी नागरिकांना आवाहन । Talegaon Dabhade

आरोग्यदायी गुणधर्म असलेली शेवगा ही एक औषधी वनस्पती असून तिच्या शेंगा, पाने, फुले आणि बिया यांचा विविध प्रकारे औषधी उपयोग होतो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 29, 2025
in लोकल, शहर
Talegaon Municipal Council appeals to citizens to plant indigenous trees such as bamboo shevga etc

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्मितीच्या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने बांबू, शेवगा या उपयुक्त देशी वृक्षप्रजातींच्या लागवडीसाठी नागरिक व विकासकांना आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्यदायी गुणधर्म असलेली शेवगा ही एक औषधी वनस्पती असून तिच्या शेंगा, पाने, फुले आणि बिया यांचा विविध प्रकारे औषधी उपयोग होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असून ती शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे गुणधर्मही असल्यामुळे मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.

या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने शेवगा प्रजातीची रोपे मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी व विकासकांनी आपल्या परिसरात, सोसायट्या, प्लॉट, संस्था परिसरात ही रोपे लावून त्याचे योग्य संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही मोहीम २ ते १० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून, रोपे नगरपरिषद कार्यालयात मोफत वितरित केली जातील. रोप घेणाऱ्या प्रत्येकाने संगोपन हमीपत्र भरून देणे अनिवार्य आहे.

हमीपत्र दिल्यानंतरच रोपे वितरित केली जातील. उपलब्ध रोपे मर्यादित असल्यामुळे ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार वाटप करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली. पर्यावरण संरक्षण ही सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, सर्वांनी मिळून ‘हरित तळेगाव’ साकारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन
– आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार
– Jeevan Bhalerao : परदेशातून पदवी घेत आईवडिलांचे स्वप्न केले साकार; हिंजवडी येथील ‘जीवन’चा कुंभार समाजातील युवकांपुढे नवा आदर्श


dainik maval jahirat

Previous Post

इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारणाऱ्या तरुणाची ओळख पटली । Maval News

Next Post

मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ekvira-Devi

मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना 'असे' कपडे परिधान करणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.