व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलिस भरतीबाबत मोठी बातमी! आता तृतीयपंथीयांनाही पोलीस भरतीत स्थान मिळणार?

तृतीयपंथीयांच्या पोलिस भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. केवळ धोरण नाही म्हणून महाराष्ट्र पोलीस भरती त तृतीयपंथीयांना डावलणे अयोग्य असल्याचे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 8, 2022
in महाराष्ट्र
Maharashtra-Police-Recruitment

File Image : Maharashtra Police Recruitment


तृतीयपंथीयांच्या पोलिस भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. केवळ धोरण नाही म्हणून महाराष्ट्र पोलीस भरती त तृतीयपंथीयांना डावलणे अयोग्य असल्याचे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. ( Employment Opportunities Can Not Be Denied To Transgenders High Court Reprimanded State Government On Police Bharti 2022 )

पोलीस हवालदारपदासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करण्यात अपयशी ठरल्याबद्दल उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला फटकारले. सरकारकडे धोरण नाही, म्हणून तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलू शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले. गृह विभागाच्या अंतर्गंत येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठीही (ट्रान्सजेंडर) पर्याय ठेवणे अनिवार्य करण्याच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) आदेशाशी प्रथमदर्शनी सहमत आहोत, असे स्पष्ट मत हायकोर्टाने व्यक्त केले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियांमध्ये स्त्री-पुरुषांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही पर्याय ठेवण्याचा आदेश मॅटने दिला होता. भरती प्रक्रियेतील तृतीयपंथीयांच्या श्रेणीसाठी शारीरिक चाचणीसाठीचे निकषही निश्चित करण्याचे आदेश मॅटच्या अध्यक्ष मृदुला भाटकर यांनी गृह विभागाला दिले होते. मात्र या निर्णयाला राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे. ( Employment Opportunities Can Not Be Denied To Transgenders High Court Reprimanded State Government On Police Bharti 2022 )

प्रकरण काय?

पोलिस हवालदार पदाचा ऑनलाईन अर्ज भरताना अर्जात पुरुष आणि स्त्री असे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने तृतीयपंथीय अर्जदार आर्य पुजारी दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडू शकला नाही. परिणामी त्याचा अर्ज स्विकारला गेला नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध नसल्याविरोधात आर्यने मॅटकडे याचिका दाखल केली होती. ज्यात त्याची बाजू ग्राह्य धरत गृह विभागाच्या सर्व भरती प्रक्रियेमध्ये यापुढे स्त्री-पुरूषांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र पर्याय ठेवण्याचे आदेश तसेच ऑनलाइन अर्जांची पडताळणी करण्याच्या दृष्टीने निकष निश्चित करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत.

अधिक वाचा –

– खळबळजनक! मावळ तालुक्यात महिला सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक
– तळेगाव दाभाडे शहर भाजपाकडून पक्ष कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन । Mahaparinirvan Diwas 2022


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे शहर भाजपाकडून पक्ष कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन । Mahaparinirvan Diwas 2022

Next Post

कौतुकास्पद! द्रुतगतीमार्गावर अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी आले ‘देवदूत’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

कौतुकास्पद! द्रुतगतीमार्गावर अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी आले 'देवदूत'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.