Dainik Maval News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव कातवीतील नागरिकांसाठी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी पर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सेवाभावी आरोग्यदायी उपक्रमाचा उदघाटन शुभारंभ मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, विघ्नहर्ता हाॅस्पिटलचे डाॅ विकास जाधावर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
- आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस २० ऑक्टोबर रोजी असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समोजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहेत. यात रोजगार प्रशिक्षण, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धा, महिला वर्गासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, लहान मुलांसाठी प्रोत्साहन स्पर्धा, वृक्षलागवड, किल्ले सफर यांसह विविध भरगच्च कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येत आहे.
आजपासून सुरू झालेल्या या शिबिरास वडगाव शहरातील नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत तपासणी केली. शिबिरादरम्यान एकूण ९३ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोरया वैद्यकीय सेवा कक्षाच्या माध्यमातून २७ ऑगस्ट रोजी पर्यंत टप्प्याटप्प्याने यां रूग्णांवर पिंपरी चिंचवड येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या रुग्णांना विनामूल्य चष्मे ही देण्यात येणार आहे.
दिनांक २० ऑक्टोबर रोजी आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस असल्याने हे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर महिन्यातून दोनदा असे सलग तीन महिने हा सेवाभावी उपक्रम राबवण्यात येणार आहे. तरी वडगाव शहरातील ज्या नागरिकांना डोळ्यासंदर्भात तक्रारी असतील त्यांनी या शिबिराचा विनामूल्य लाभ घ्यावा, असे मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्षा अबोली ढोरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
याप्रसंगी विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉक्टर विकास जाधवर, दिव्यदृष्टी व चाकणे आय ट्रस्ट चे अनुज शहा, मा नगरसेविका पुनम जाधव, उपाध्यक्ष चेतना ढोरे, यशवंत शिंदे तसेच मोरया महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, संचालिका, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट
– पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप