व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, February 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळवासीयांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार सुनील शेळके

राजमाची, कळकराई सारख्या दुर्गम भागांतील वीज समस्येवर उपाय शोधत वनविभागाची परवानगी घेऊन तातडीने काम सुरू करावे - आमदार शेळके यांचे निर्देश

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 3, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
MLA Sunil Shelke directs Mahavitaran officials to ensure uninterrupted and smooth power supply to Maval residents

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार व अखंड वीजपुरवठा मिळावा या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पुणे मंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सन २०२३-२४ व २०२४-२५ मधील डीपीडीसी निधीतून मंजूर कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

यावेळी दुर्गम भागातील वीज समस्या दूर करण्याचा निर्धार करण्यात आला राजमाची, कळकराईसारख्या दुर्गम भागांतील वीज समस्येवर उपाय शोधत वनविभागाची परवानगी घेऊन तातडीने काम सुरू करावे, असे निर्देश आमदार शेळके यांनी दिले. “आंदर मावळाला सतत भेडसावणारा वीजेचा लपंडाव आता संपायला हवा,” असे सांगत त्यांनी नव्याने मंजूर झालेल्या वडेश्वर सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

यावेळी शहरी भागांसाठी ठोस निर्णय करण्याबाबत देखील सखोल चर्चा झाली. कामशेत शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाबाबत व्यक्त केलेल्या असमाधानावर त्वरित उपाय म्हणून फीडर, कंडक्टर आणि जी.ओ.डी. बदलण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील जुने झालेल्या डी.पी. बॉक्स तातडीने बदलून नवे बसविण्याचे आदेश देण्यात आले.

देहू शहरातील वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करून स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले. तर देहूरोड कॅंटोन्मेंट भागातील वीज समस्यांवर विस्तृत चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजना ठरविण्यात आल्या.

यावेळी बैठकीस अधीक्षक अभियंता युवराज जरग, सिंहाजी गायकवाड, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, अतुल देवकर, किरण सरोदे तसेच वडगाव, लोणावळा, तळेगाव, देहू व देहूरोड येथील विद्युत वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रविण झेंडे, योगेश काळोखे, विवेक काळोखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “मावळवासीयांना अखंड, सुरळीत वीजपुरवठा मिळावा हे आमचे प्राधान्य आहे. गावागावांपर्यंत वीजेचा लपंडाव दूर करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची बांधिलकी आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजपुरी, जांभूळ, साते, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी येथे प्रशांत भागवत यांचे जल्लोषात स्वागत ; इच्छूक उमेदवार म्हणून दणदणीत प्रतिसाद
– गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार
– देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश


Previous Post

राजपुरी, जांभूळ, साते, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी येथे प्रशांत भागवत यांचे जल्लोषात स्वागत ; इच्छूक उमेदवार म्हणून दणदणीत प्रतिसाद

Next Post

मावळ तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल ; विदेशी वृक्षांच्या जागी स्थानिक प्रजातींची लागवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
big step for environmental conservation in Maval taluka Planting of local species in place of exotic trees

मावळ तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी मोठे पाऊल ; विदेशी वृक्षांच्या जागी स्थानिक प्रजातींची लागवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
Marathi Language Conservation Fortnight celebrated at Savitribai Phule Women College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ उत्साहात साजरा

February 2, 2026
Spontaneous response from women entrepreneurs to BizQuin competition organized by Skilletz Foundation

स्किलेट्झ फाउंडेशन आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित बिझक्विन स्पर्धेला महिला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 2, 2026
NCP candidate Pallavi Sandeep Dabhade receives increasing support from voters in Induri Varale Zilla Parishad group Maval

इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवी संदीप दाभाडे यांना मतदारांचा वाढता पाठींबा

February 1, 2026
Voters respond positively to Dr Ashok Vitthal Date candidature in Takve Budruk Nane Zilla Parishad group Maval

टाकवे बुद्रुक – नाणे जिल्हा परिषद गटात डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीला मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

February 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.