व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल ! लोकअदालतीत तब्बल ६६५ कोटी रुपये तडजोड रक्कम जमा । Pune News

एकाच दिवशी सुमारे दीड लाख प्रकरणे निकाली ; एकूण १३५ पॅनेलच्या माध्यमातून कामकाज

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 17, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Lok-Adalat

File Image


Dainik Maval News : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी ( दि. १३ सप्टेंबर) शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अशोका सभागृहामध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीसाठी दाखल २ लाख ४३ हजार ४२४ प्रकरणांपैकी १ लाख २७ हजार ५४१ प्रकरणे आणि विशेष मोहिमेत १७ हजार ५६० याप्रमाणे १ लाख ४५ हजार १०१ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे, या माध्यमातून ६६५ कोटी ४४ लाख ८१ हजार ६२१ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या हस्ते लोकअदालतचे उद्धघाटन करण्यात आले. या उपक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती डेरे-मोहिते आणि संदीप मारणे यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या.

दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश :
लोकअदालतमध्ये दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश प्राप्त झाले असून एकूण ९८ कोटी २५ लाख ६२ हजार ३९४ रक्कम तडजोडीपोटी जमा झाले आहेत. यामध्ये दाखल पूर्व (प्रि-लिटिगेशन) १ लाख ८४ हजार ७४४ दाखल प्रकरणांपैकी १ लाख ३ हजार ६६ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत. याशिवाय तडजोडीसाठी घेण्यात आलेल्या एकूण ५८ हजार ६८० दाखल दाव्यापैकी (पोस्ट लिटिगेशन) २४ हजार ४७५ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यासह विशेष मोहिमेंतर्गत १७ हजार ५६० प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये ५६७ कोटी १९ लाख १९ हजार २२७ रुपये तडजोड वसूल शुल्क करण्यात आले आहे.

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ५० हजार ३८०, तडजोड पात्र फौजदारी १८ हजार ३७४, वीज देयक १६२, कामगार विवाद खटले ७, भुसंपादन ३७, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण ३५, वैवाहिक विवाद ६८, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट २ हजार ४, इतर दिवाणी ४६३, महसूल १ हजार ३७६, पाणी कर ४८ हजार १६७, ग्राहक विवाद ५ आणि इतर ६ हजार ४६३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.एकूण १३५ पॅनेलच्या माध्यमातून कामकाज करण्यात आले.

एम.के. महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश: लोक अदालत ही केवळ वाद निपटाऱ्याची पद्धत नसून ती एक लोकाभिमुख चळवळ आहे. लोक अदालत ही न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ करते. लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचा विक्रमी निपटारा हा सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.

श्रीमती सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण: या ऐतिहासिक यशामागे सर्व न्यायमूर्ती, वकीलवृंद, न्यायालयीन कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे अथक योगदान आहे. लोक अदालतीत एकाच दिवशी सुमारे एक लाख ४५ हजार प्रकरणांचा निपटारा होणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह न्यायमूर्ती, वकीलगण, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, बँक, इतर वित्तीय संस्था आदींचे सहकार्य लाभल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आभार व्यक्त करते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत येथील संतोष कुंभार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ; ‘समाजासाठी आयुष्य वाहिलेले हभप संतोष महाराज कुंभार’

Next Post

मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Agricultural Produce Market Committees APMC

मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ - वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.