व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

व्यासंगी इतिहास संशोधकाला महाराष्ट्र मुकला ; ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन । Gajanan Mehendale Passes Away

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र ऐतिहासिक पुराव्यासह जगासमोर मांडणाऱ्या व्यासंगी इतिहास संशोधक, मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 18, 2025
in महाराष्ट्र, देश-विदेश
Gajanan Mehendale Passes Away

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र ऐतिहासिक पुराव्यासह जगासमोर मांडणाऱ्या व्यासंगी इतिहास संशोधक, मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे. ही इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

व्यासंग आणि अभ्यासातून त्यांनी शिवाजी महाराज आणि स्वराज्याविषयी अमुल्य अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यामुळे ते शिवचरित्रकार म्हणून अजरामर राहतील, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नमूद केले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, युद्ध पत्रकार ते भारत इतिहास संशोधन मंडळात प्रवेश आणि पुढे युद्धशास्त्राचा अभ्यासक, इतिहास संशोधक म्हणून मेहेंदळे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असा राहिला. त्यांनी शिवकालीन इतिहास सप्रमाण मांडला. त्यांची ही संशोधन साधना, वैविध्यपूर्ण लेखन आणि सिद्ध झालेली ग्रंथसंपदा ही जगासाठी अमूल्य असा ठेवा आहे. त्यांचे शिवप्रेमींसह, पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मौलिक कार्य आहे.

शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या सखोल अभ्यासासाठी ते मोडी लिपी बरोबरच फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज अशा भाषा शिकले. संदर्भ मिळविण्यासाठी, अभ्यासकांशी चर्चेसाठी ते भारतभर फिरले. यातून ‘Shivaji his Life and Times’ हा इंग्रजी तर ‘श्री राजा शिवछत्रपती’ या मराठी ग्रंथांची निर्मिती झाली.

‘शिवछत्रपतींचे आरमार’, ‘आदिलशाही फर्माने’ या पुस्तकांमुळे अनेक ऐतिहासिक संदर्भ आपल्याला मिळाले. मेहेंदळे अनेकविध संस्थांचे मार्गदर्शक म्हणूनही महत्वाची भूमिका बजावत होते. इतिहास संशोधनाला अखंडपणे वाहून घेतलेल्या या मार्गदर्शक, व्यासंगी शिवचरित्रकाराचे निधन ही मोठी हानी आहे.

मेहेंदळे यांच्या निधनामुळे या क्षेत्रात पोकळी जाणवत राहील. त्यांच्या जाण्याने मेहेंदळे कुटुंबियांवर, त्यांचे संशोधक सहकारी, विद्यार्थी यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा नगरपंचायत प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन

Next Post

तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Make arrangements to provide training at National Institute of Post-Harvest Technology Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा - पणन मंत्री जयकुमार रावल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.