Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी होत असलेल्या दुसरा टप्प्यातील मतदानासाठी ४ प्रभागातील २० केंद्र निश्चित करण्यात आली आहे.
प्रभाग क्र. २ करिता एमआयटी प्री-स्कूल कॅम्पस, मायमर हॉस्टेल कॅम्प येथे ६ केंद्र, प्रभाग क्र. ७ करिता माउंट सेंट अॅन हायस्कूल मुख्य इमारत येथे ५ केंद्र, प्रभाग क्र. ८ करिता नवीन समर्थ विद्यालय येथे ३ आणि सह्याद्री इंग्लिश स्कूल येथे २ केंद्र आणि प्रभाग क्र. १० करिता थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा येथे ४ केंद्रावर सकाळी ७.३० ते संध्या. ५.३० यावेळेत मतदान होणार आहे.
तसेच, मतमोजणी रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नवीन प्रशासकीय इमारत येथे होणार आहे. मतमोजणीसाठी २ नोडल अधिकारी, १४ झोनल अधिकारी आणि २८ मतमोजणी सहाय्यक व पर्यवेक्षक नियुक्त आहेत यासोबतच नगर परिषदेचे ६० कर्मचारी सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत.
दिनांक १९ डिसेंबर रात्री १० नंतर कोणताही प्रचार, सभा किंवा ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी दिली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले

