व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Pune : पुणे पोलीस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे, पाच नवीन पोलीस ठाणी मंजूर ; नवीन पोलीस ठाण्यासाठी १६६ पदांची मंजुरी

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 20, 2025
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Two new circles five new police stations approved in Pune Police Commissionerate

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. याअंतर्गत दोन नवीन परिमंडळांची आणि पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना करून दोन नवीन परिमंडळ निर्माण करण्याबाबत तसेच त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला १३ ऑक्टोबर रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली. त्यानंतर राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.

या शासन निर्णयानुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या पाच परिमंडळांची पुनर्रचना करून आणखी दोन नवीन परिमंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाची नवीन परिमंडळीय संरचना नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीनुसार निश्चित केली जाणार आहे.

पुढील नवीन पोलीस ठाणी अस्तित्वात येणार आहेत :
१) नऱ्हे पोलिस ठाणे
२) लक्ष्मीनगर पोलिस ठाणे
३) मांजरी पोलिस ठाणे
४) लोहगाव पोलिस ठाणे
५) येवलेवाडी पोलिस ठाणे

ही नवीन पोलिस ठाणी सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस ठाण्यांच्या विभागणीतून तयार केली जाणार आहेत. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातून नऱ्हे, येरवडा पोलिस ठाण्यातून लक्ष्मीनगर, हडपसर पोलिस ठाण्यातून मांजरी, विमानतळ पोलिस ठाण्यातून लोहगाव, तर कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातून येवलेवाडी पोलिस ठाणे कार्यान्वित होणार आहेत.

प्रत्येक नवीन पोलिस ठाण्यासाठी १६६ पदांची मंजुरी देण्यात आली असून, एकूण ८३० पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच गुन्ह्यांच्या तपासात गती येईल. नागरिकांना तातडीची सेवा मिळेल आणि पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील बधलवाडी गावात आढळली प्राचीन हनुमान मूर्ती ; मंदिराचे पुनःनिर्माण करताना जमिनीखालील चपेटदान मुद्रेतील मूर्ती प्रकाशात

Next Post

Vadgaon Nagar Panchayat : कोण उधळणार विजयाचा गुलाल? एका तासात लागणार वडगाव नगरपंचायतीचा निकाल, नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Election 2025

Vadgaon Nagar Panchayat : कोण उधळणार विजयाचा गुलाल? एका तासात लागणार वडगाव नगरपंचायतीचा निकाल, नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.