व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, November 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळा-खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 2, 2026
in महाराष्ट्र, देश-विदेश
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई – पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या पूर्णतेची प्रतीक्षा आणखीन लांबणीवर पडली आहे. लोणावळा-खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासाठी सरकारने आता ३० एप्रिल ही नवीन डेडलाईन निश्चित केली आहे. याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा झाली.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या लोणावळा-खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत विधानसभेत आमदार रईस शेख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकल्पाची डिसेंबर २०२५ ची मुदत संपली असून अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र आणि पर्यावरण मंजुरी मिळालेली नाही का, असा सवाल त्यांनी विचारला होता. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उत्तर देण्यात आले असून एप्रिल २०२६ मध्ये मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होईल असे त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळा-खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. त्यांनी थेट एकनाथ शिंदें यांना मिसिंग लिंक सुरू होण्यास उशीर का होत आहे? त्याची कारणे काय आहेत? असा थेट सवाल विचारला.

मिसिंग लिंक प्रकल्पाची मुदत डिसेंबर २०२५ मध्ये संपली आहे. मग अजून सुरू का झाले नाही? ठरलेल्या मुदतीत लोणावळा-खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, तरीही अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी व नियंत्रण सेंटर मिळालेले का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रईस शेख यांच्या या प्रश्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले.

लोणावळा-खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुदत डिसेंबर २०२५ पर्यंत होती. पण भौगोलिक आणि तांत्रिक आव्हांनामुळे कामास विलंब झाला. पण आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत सुधारित मुदत निश्चित करण्यात आली आहे. लवकरच मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला कऱण्यात येणार आहे. सुरक्षा प्रमाणपत्र आणि पर्यावरण मंजुरी अद्याप मिळाली नाही, हा दावा खोटा असल्याची माहिती शिंदेंनी विधिमंडळात दिली.

पर्यावरण विभागाची मंजुरी यापूर्वीच प्राप्त झाली आहे. नियंत्रण कक्षाचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे उर्वरित स्थापत्य काम अंतिम टप्प्यात आहे. वाहतूक सुरू करण्यापूर्वी सर्व सुरक्षा चाचण्या घेतल्या जातील. पर्यावरण मंजुरी आणि नियंत्रण सेंटर आधीच उपलब्ध असल्याने विलंबाबाबतच्या चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही, असे शिंदे म्हणाले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण


dainik maval jahirat

Previous Post

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

Next Post

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.