व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

आंदर मावळातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, बचत गटातील महिला, ग्रामपंचायत अधिकारी तसेच महिला सरपंच अशा विविध क्षेत्रातील महिलांना “वूमन अँड चाईल्ड फ्रेंडली चॅम्पियन ” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 11, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे आणि गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड टाकवे चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, दीपप्रज्वलन आणि पूजनाने झाली. यावेळी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले आणि राजमाता जिजामाँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून ग्लेन जोन्स, (कंट्री मॅनेजर/सीईओ), डॉ. कॅरोलिन डी वोल्टर (संस्थापक होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे ), सुभाष गायकवाड (उमेद अभियान, पंचायत समिती वडगाव मावळ)शोभा वाहिले शिक्षण विभाग आणि सविता भोरे (सेंटर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर – सखी वन स्टॉप सेंटर) उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. कॅरोलिन डी वोल्टर व ग्लेन जोन्स, यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की महिलांनी शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिलांची सुरक्षा, आरोग्य आणि सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे.

तसेच होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे आणि गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड टाकवे चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षांपासून ग्रामीण भागात विविध सामाजिक प्रकल्प राबवत असून विशेषतः *बाल स्नेही पंचायत* उपक्रमांतर्गत महिला व बालकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. या उपक्रमांतर्गत विविध गावांमधील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी आंदर मावळातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, बचत गटातील महिला, ग्रामपंचायत अधिकारी तसेच महिला सरपंच अशा विविध क्षेत्रातील महिलांना “वूमन अँड चाईल्ड फ्रेंडली चॅम्पियन ” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात महिलांच्या यशोगाथांचे व्हिडिओ सादरीकरण, आरोग्यविषयक माहिती, खेळ, झुम्बा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गेस्टॅम्प कंपनी चे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संचालन अधिकारी शकील शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन वर्षा कुलकर्णी व ऋषिकेश डिंबळे यांनी केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड


dainik maval jahirat

Previous Post

पुणे, नागपूर सहीत ‘या’ ११ जिल्ह्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Next Post

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.