व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर या प्रकल्पाचा मार्ग संत तुकाराम महाराजांचे पवित्र स्थळ असलेल्या भंडारा डोंगराखालून जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 18, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, व्हिडिओ, शहर
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर या प्रकल्पाचा मार्ग संत तुकाराम महाराजांचे पवित्र स्थळ असलेल्या भंडारा डोंगराखालून जात आहे. त्यामुळे या मार्गात बदल करावा. धार्मिक भावना व पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी रेल्वे मार्गाची अलाईनमेंट बदलवावी. पुणे ते लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे सुरु करावी. पुणे–लोणावळा तिसरा व चौथा रेल्वे मार्गिकेसाठी राज्य सरकारने ५ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारनेही यास गती देण्यासह राज्यातील विविध रेल्वेच्या प्रश्नांकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

रेल्वेच्या २०१६-२७ च्या अर्थसंकल्पावर शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ तसेच महाराष्ट्राशी संबंधित विविध रेल्वे विषयक महत्त्वाचे प्रश्न मांडले. वाढत्या प्रवासी संख्येचा आणि औद्योगिक तसेच पर्यटन क्षेत्राच्या गरजांचा विचार करता महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना अधिक गती देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. खासदार बारणे म्हणाले, देशात चार हजार किलोमीटर हाय स्पीड कॉरिडोर बनविण्याची तयारी सुरु आहे. मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि बंगळुरु या प्रमुख आर्थिक शहराला हा कॉरिडोर जोडणार आहे. यामुळे रेल्वेची नवीन आणि आधुनिक क्रांती होईल. मुंबई परिसरात जागा नसल्याने भुयारी किंवा ओव्हर राईड रेल्वे करण्याची गरज आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लोणावळा स्थानकावर मुंबई–पुणे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला थांबा द्यावा.

पुणे ते लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे सुरु करावी. पुणे–लोणावळा तिसरा व चौथा रेल्वे मार्गिकेसाठी राज्य सरकारने ५ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारनेही यास गती दिल्यास लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल. ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, लोणावळा आणि पनवेल स्थानकांच्या पुनर्विकास केला आहे. कर्जत स्थानक राहिले आहे. कर्जत स्थानकाचाही समावेश करावा. कर्जत रेल्वे स्टेशन तयार होत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ रायगडपर्यंत विस्तारला आहे. श्री संत तुकाराम महाराजांची पावन भूमी देहूगाव आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची तपोवन भूमी आळंदीत वर्षभरात लाखो वारकरी येतात. पंढरपूर, देहू आणि आळंदी या पवित्र स्थळांपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याबरोबरच वारकऱ्यांसाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात यावी. रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करावे. ही तीर्थस्थळे भक्तीची केंद्रे आहेत. चार ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूर ते पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत सुरु करावी. महाराष्ट्रातील प्रवासी, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना देणारे प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत. लोणावळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी सुविधा करावी. रेल्वे विभागाच्या जागेवर झालेल्या झोपड्यांवर एसआरए योजना लागू करावी. झोपडीत राहणाऱ्या लोकांना हक्काचे घर मिळेल, असेही खासदार बारणे म्हणाले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना


dainik maval jahirat

Previous Post

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

Next Post

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.