व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावकरांना पाणीप्रश्नावर मोठा दिलासा ; यशवंतनगर येथील ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

नगरपरिषदेच्या माध्यमातून यशवंत नगर येथे ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आज उत्साहात संपन्न झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 6, 2026
in लोकल, शहर
Big relief for Talegaon Dabhade People on water issue Inauguration of water purification center at Yashwant nagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अखेर मोठा दिलासा मिळाला असून, नगरपरिषदेच्या माध्यमातून यशवंत नगर येथे ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आज उत्साहात संपन्न झाले.

आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे स्टेशन परिसरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपरिषदेच्या सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सत्यकमल कॉलनी, म्हाडा कॉलनी, रेनो कॉलनी, स्टेशन चौक आणि यशवंत नगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार असून चौराई येथील मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पावरील ताणही कमी होणार आहे.

स्टेशन भागातील नागरिकांना पाण्यासाठी दररोज करावी लागणारी कसरत लक्षात घेऊन हा प्रकल्प साकारण्यात आला असल्याचे सांगताना आमदार शेळके यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याचा आपला संकल्प पुन्हा अधोरेखित केला. तसेच तळेगाव स्टेशन परिसरासाठी आंद्रा धरणातून बंदिस्त पाईपलाईन योजनेला अंतिम टप्प्यात मंजुरी मिळत असून, लवकरच या योजनेची कामेही सुरू होणार असल्याने भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणीप्रश्न सुटल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार सुनील शेळके यांचे आभार मानले. या लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्ष संतोष दाभाडे, सुरेश चौधरी, नाना कारके, दर्शन खांडगे, गणेश काकडे, सुरेश धोत्रे, इंदर ओसवाल यांसह नगरसेवक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाचे पालन करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 संचालकांचे राजीनामे, 4 संचालकांकडून मात्र ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
– लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर
– आजिवली येथील रक्तदान शिबिरात १५ महिलांसह एकूण ८० जणांचे रक्तदान ; २३१ जणांची मोफत नेत्र तपासणी
– भाजपाचा धोबीपछाड, नेत्यांचा थयथयाट ! बाजार समितीतील राष्ट्रवादीच्या सर्व संचालकांना राजीनामे देण्याचे आदेश ? नक्की काय घडलं


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहराचा ‘स्मार्ट सिटी’ धर्तीवर विकास आराखड्यास गती ; ‘एआय’ आधारित CCTV, रस्ते सुशोभीकरण व ट्रॅफिक व्यवस्थापनावर भर

Next Post

मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Two new metro projects should be approved in Maval taluka Bala Bhegde demands from CM Devendra Fadanvis

मावळ तालुक्यात दोन नवीन मेट्रो प्रकल्पांना मंजूरी द्यावी ; बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.