व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरूणाचा अंत

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रथमेश लोणारी आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी कुंडमळा परिसरात गेला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 19, 2026
in ग्रामीण, लोकल, शहर
24 year old youth drowned in the Indrayani river at Kundamala near Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातून पुन्हा एकदा दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यात पाणी असलेल्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या मृत्यूचे सत्र थांबताना दिसत नसून, सलग तिसऱ्या दिवशी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कुंडमळा येथील इंद्रायणी नदीपात्रात बुडून पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी येथील २४ वर्षीय प्रथमेश लोणारी याचा मृत्यू झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रथमेश लोणारी आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी कुंडमळा परिसरात गेला होता. नदीपात्रात प्रथमेशला पाण्याचा अंदाज चुकल्याने तो डोहात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीम आणि तळेगाव आंबी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली अखेर डोहात प्रथमेशचा मृतदेह आढळून आला.

घटनेचे गांभीर्य ओळखून वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र, लोणावळा या संस्थांच्या सदस्यांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. सामाजिक कार्यकर्ते सागर भेगडे यांनी समन्वय साधला, तर तळेगाव दाभाडे MIDC पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी या मोहिमेत मोलाचे सहकार्य केले. या रेस्क्यू टीममध्ये निलेश गराडे, भास्कर माळी, रवी कोळी, विराज गराडे, विनय सावंत, शाहरुख सय्यद, राजु सय्यद आणि कुंदन भोसले या सदस्यांचा समावेश होता. अत्यंत कठीण परिस्थितीत आणि पाण्याच्या खोल प्रवाहात उतरून या पथकाने अवघ्या १० मिनिटांत शोधकार्य पूर्ण केले.

मावळ परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या या मृत्यूमुळे स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुंडमळा सारख्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि खोली अत्यंत धोकादायक असल्याने तिथे पाण्यात उतरण्यास प्रशासनाने सक्त बंदी घातली आहे. असे असतानाही, प्रथमेश लोणारी आणि त्याचे मित्र या प्रतिबंधित क्षेत्रात नेमके कसे पोहोचले आणि त्यांनी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष का केले? याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान 


Previous Post

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

Next Post

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
24 year old youth drowned in the Indrayani river at Kundamala near Talegaon Dabhade

तळेगाव जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरूणाचा अंत

April 19, 2026
Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.