Dainik Maval News : तळेगाव-चाकण रोडवरील ऐश्वर्या हॉटेलच्या मागे असलेल्या पी.डब्ल्यू.डी. गोदामाजवळील मोकळ्या जागेत अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी ४४ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार आनंद तुकाराम मोहिते यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल रोहिदास पडवळ (वय ३०, रा. चाकण) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल हा गोदामाच्या मागे संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत ८५६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. हा अमली पदार्थ तो बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी घेऊन आला होता. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा


