Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये लोकसेवा हक्क दिनाच्या निमित्ताने आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा देण्यासाठी हे सेवा केंद्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच नागरिकांना अधिक सुलभ व प्रभावी सेवा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात उपमुख्याअधिकारी ममता राठोड विविध भागाचे प्रमुख तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकसेवा बाबतची सामुदायिक शपथ घेण्यात आली. तसेच नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा देण्याबाबत कटिबद्ध राहण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली. या कार्यक्रमात सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे यांनी केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न
– तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा
– सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी
– लोणावळा शहरात ‘व्हिला’ ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा