व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

देहूरोड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2026
in लोकल, शहर
crime-arrested

File Photo


Dainik Maval News : बेकायदेशीररित्या गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला मुद्देमालासह अटक करण्यात आले. तसेच याप्रकरणी आणखीन एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी ( दि. ४ मे ) दुपारी अडीचच्या सुमारास देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेडकरनगर कडून शितळानगर कडे जाणाऱ्या दुहेरी मार्गालगतच्या फुटपाथवर, हॉटेल महाराष्ट्र समोर ही कारवाई करण्यात आली.

अनिल जगन्नाथ बोरसे (वय ४२ वर्षे, रा. आंबेडकर नगर रोड, देहूरोड) आणि महिला आरोपी अशी आरोपींची नावे आहे. यातील आरोपी अनिल बोरसे अटकेत आहे. पोलीस शिपाई रणधीर रमेश माने ( अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल बोरसे याने त्याच्या ताब्यात एकुण १२ हजार १०० रुपये किंमतीचा २४२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आणि एक मोबाईल इतर चीजवस्तू असा एकूण २२ हजार ३५० रुपये किंमतीचा माल बेकायदेशिररित्या विक्री करीता कब्जात बाळगताना मिळुन आला आहे.

त्याच्याकडे मिळुन आलेला गांजा हा त्याने कोणाकडुन आणला याबाबत चौकशी केली असता त्याने, आरोपी क्रमांक असलेल्या महिला आरोपीकडून विक्री करीता आणल्याचे सांगितले. असे फिर्यादीत नमुद आहे. पुढील तपास पोलीस उप निरिक्षक डोंगळे हे करीत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


Previous Post

Kamshet Accident : कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलावर कारला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
Kamshet Accident Car catches fire on flyover on old Pune-Mumbai highway One dies of burns

Kamshet Accident : कामशेत येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपूलावर कारला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.