व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

या स्थगिती आदेशामुळे बाजार समितीचे कामकाज प्रशासकाच्या हाती नसणार हे स्पष्ट झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाला राज्याचे सहकार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे भाजपाचे सभापती सहीत पाचही संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाने प्रशासकीय हस्तक्षेपाला तूर्तास लगाम बसला आहे.

तळेगाव दाभाडे येथील मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ संचालकांपैकी १३ संचालकांनी एप्रिल महिन्यात पदांचे राजीनामे सहाय्यक निबंधकांकडे सादर केले होते. १३ संचालकांनी राजीनामा दिल्याने समितीची गणपूर्ती पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करीत जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण यांनी १३ एप्रिल २०२६ रोजी बाजार समितीवर प्रशासक म्हणून वडगावचे सहायक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती केली.

जिल्हा उपनिबंधकांच्या या आदेशाला सभापती सुभाष जाधव आणि इतर पाच संचालकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने पणन मंत्री यांच्याकडे हे प्रकरण सुनावणी आणि निर्णयाकरिता वर्ग केल्यानंतर, २८ एप्रिल २०२६ रोजी पणन मंत्र्यांपुढे या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

अपिलकर्त्यांच्या वतीने ॲड. अभय ईनामदार आणि ॲड. निरंजन देसाई यांनी युक्तिवाद केला की, संचालकांनी त्यांचे राजीनामे कायद्यानुसार सभापतींकडे न देता थेट निबंधकांकडे दिले होते, जे कायदेशीररीत्या अवैध आहेत. तसेच, राजीनाम्यांवरील स्वाक्षऱ्यांची कोणतीही पडताळणी करण्यात आली नव्हती आणि संचालकांना आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी दिली गेली नव्हती.

सहकार मंत्र्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट नमूद केले की, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील कलम १६ (१) नुसार राजीनामे सभापतींना देणे अपेक्षित असताना ते निबंधकांकडे देण्यात आले. तसेच राजीनाम्यांची खात्री न करता, व संचालकास वैयक्तिक सुनावणीची पुरेशी संधी न देता आदेश पारीत केल्याचे दिसून येते. तसेच प्रशासक नियुक्त करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाशी आवश्यक सल्लामसलत केल्याचे दिसून येत नाही. या कायदेशीर त्रुटी लक्षात घेता, मंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या १३ एप्रिल २०२६ च्या आदेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

या स्थगिती आदेशामुळे बाजार समितीचे कामकाज प्रशासकाच्या हाती नसणार हे स्पष्ट झाले आहे, या निर्णयाचे मावळ भाजपा कडून स्वागत होत आहे. तसेच पुढील सुनावणीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल
– शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही
– लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार बारणे यांची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

Next Post

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.