व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न

मावळ तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, प्रत्येक विकासकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 17, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
special meeting held at PMRDA office on initiative of MLA Sunil Shelke regarding development works in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून मंगळवारी (दि. १२ मे) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालय येथे आयुक्त अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक पार पडली.

सदर बैठकीमध्ये प्रस्तावित रिंगरोड व नगररचना योजना (TP स्कीम) संदर्भात शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत असलेल्या अडचणी व विरोधाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या असून, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि योग्य तो मार्ग निघावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. याबाबत येत्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

सांगवडे ते मामुर्डी दरम्यान पवना नदीवरील पुलाच्या जोडरस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याबाबत PMRDA व पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे अधिकारी यांच्या संयुक्त पाहणीचे निर्देश देण्यात आले.

देहू ते येलवाडी रस्त्याचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून येत्या ७ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच देहू शहराच्या ड्रेनेजलाईन प्रश्नासाठी DPR तयार करून प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

मावळ तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, प्रत्येक विकासकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी PMRDA च्या सर्व विभागांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा
– कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार
– पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ

Next Post

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Training camp held at Vadgaon Maval in connection with Special In-depth Review of Voter Lists SIR program

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.