व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न

प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्याकडून सखोल मार्गदर्शन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 17, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Training camp held at Vadgaon Maval in connection with Special In-depth Review of Voter Lists SIR program

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ च्या (SIR) पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक, पारदर्शक व त्रुटीमुक्त करण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, महसूल सेवक तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे व्यापक प्रशिक्षण विशाल लॉन, वडगाव मावळ येथे (दि. १६ मे) आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदार याद्यांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आयोजित या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये मतदारांचे मॅपिंग करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, दुबार मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नोंद तपासणे तसेच नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे याबाबत सखोल माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी घरभेटी दरम्यान कोणती खबरदारी घ्यावी, कागदपत्रांची पडताळणी कशी करावी तसेच नागरिकांशी समन्वय साधून कामकाज कसे करावे याबाबतही सूचना करण्यात आल्या.

तसेच २० जूनपासून लागू होणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेनंतर करावयाच्या कामकाजाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्याची पद्धत, नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारणे, नोंदींची पडताळणी करणे तसेच अहवाल सादर करण्याची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

  • निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मतदार याद्या अद्ययावत ठेवणे ही लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाची जबाबदारी असून प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने व काटेकोरपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विक्रम देशमुख, अमोल पाटील, अशोक साबळे, प्रविण निकम, गिरीश दापकेकर, चेतन कोंडे तसेच सेवक थोरात उपस्थित होते.

प्रशिक्षणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, महसूल विभागातील कर्मचारी, नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी, निवडणूक शाखेतील कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी विविध शंका उपस्थित करत कामकाजाबाबत माहिती घेतली. आगामी काळात मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा
– कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार
– पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न

Next Post

अज्ञात आरोपीकडून एकावर झोपेतच प्राणघातक हल्ला ; निळशी येथील धक्कादायक प्रकार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

अज्ञात आरोपीकडून एकावर झोपेतच प्राणघातक हल्ला ; निळशी येथील धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.