Dainik Maval News : अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून एका व्यक्तीवर तो झोपेत असताना प्राणघातक हल्ला केला. शनिवारी (दि. १६ मे २०२६) रोजी दीडच्या दरम्यान मौजे निळशी (पो. खांडी ता. मावळ) गावच्या हददीत विश्वास देशमुख यांचे घराच्या टेरेसवर हा प्रकार घडला.
याप्रकरणी हर्ष वसंत कांबळे (वय 24 वर्षे, रा. ढोरेवाडा, वडगाव, मुळ राह. निळशी, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर (नाव व पत्ता माहित नाही) वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109, आर्म अॅक्ट 4 (25) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कुलदीप चंद्रकांत कांबळे (वय 34 वर्षे, रा. दहिसर मुंबई) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते कुलदीप चंद्रकांत कांबळे (वय 34 वर्षे) हे गावातील प्रमोद दत्तात्रय म्हसे यांच्या बरोबर झोपी गेले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणा-या तलवारी सदृश्य हत्याराने कुलदीप कांबळे यांच्या चेहऱ्याचे डाव्या बाजुला गालावर वार करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. मानसिंग कोचे आणि स.पो.नि राऊळ यांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सचिन राऊळ हे करीत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी ! तळेगाव नगरपरिषदेकडून कनिष्ठ महाविद्यालयाची घोषणा
– कुंभार कारागिरांना 9 महिने उचलता येणार माती, 700 ब्रासच्या मर्यादेवर कोणताही दंड नाही ; वीटभट्टीसाठी ५ वर्षांसाठी सलग परवानगी मिळणार
– पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा

