व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर दिवस-रात्र वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असलेल्या दिसत आहेत...

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 20, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Photo Courtesy : Team Dainik Maval


दैनिक मावळ (प्रतिनिधी) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सेंट्रल चौक, घोरावाडी डोंगर पायथा, सोमाटणे फाटा खिंड, लिंब फाटा, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव फाटा या ठिकाणी दिवस-रात्र वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असलेल्या दिसत आहेत. हा खुलेआम सुरू असणारा वेश्या व्यवसाय बंद करावा, अशी मागणी जागरूक नागरिक वारंवार करीत आहेत.

सीआरपीएफ कॅम्प, वडगाव फाटा याठिकाणी तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठराविक महिला सकाळी सात-आठ वाजलेपासून उभ्या असतात. तोंडावर मास्क लावून ‘सावज’ हेरणाऱ्या ह्या महिलांना पाहून मार्गाने ये-जा करणाऱ्यांची मोठी कुचंबना होते. दुचाकीवरून जाणारी कुटुंबे लहान मुलांची तोंडे फिरवतात, तर सामान्य महिलांची मोठी कुचंबना होते.

  • पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचा होतोय आरोप
    अनेकदा आंबटशौकीन कुतुहलापोटी ह्या महिलांना पाहून अचानक वाहन थांबवितात, यामुळे आजवर अनेकदा अपघात झाले आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर जिथे जिथे ह्या महिला उभ्या असतात, तिथून काहीएक अंतरावर पोलीस ठाणे आहे. दिवसभर पोलीस अन् त्यांची वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. परंतु पोलिसाकडून या महिलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसते. पोलिसांची ही वागणूक संशयास्पद असून सामान्य नागरिकांना अनाकलनीय अशी आहे. पोलिसांचे यात अर्थपूर्ण संबंध आहेत की काय, असा प्रश्न यातून निर्माण होतो.

पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेवर संशय
सायंकाळच्या सुमारास वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या भलतीच वाढते. शौकीन देखील भराभर येऊ लागतात. यातून कळपाकळपाने दिसणारे हे दृश्य सर्वसामान्य नागरिकांना सामजिकदृष्ट्ट्या अहिताचे वाटत असते, परंतु ते रोखण्याचे धाडस किंवा अधिकार त्यांच्याकडे नसतात. परंतु ज्या पोलीस प्रशासनाकडे हे अधिकार आहेत, ते दोन – तीन वर्षात फोफावलेल्या या धंध्याकडे का दुर्लक्ष करीत आहेत? हा मोठा प्रश्न आहे. नाही म्हणायला जिथे या महिला उभ्या असतात, तिथे पोलिसांच्या गाड्या रात्रीच्या वेळी जातात. परंतु अनेकदा पोलीस पुढे निघून गेले आणि वेश्या व्यवसाय करणारी महिला तिथेच उभी राहिल्याचे चित्र पाहण्यात आले आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत अनेक लॉज आहेत. महामार्गावर जिथे ह्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असतात, त्यांना तिथूनच गाडीवर किंवा कारमध्ये बसवून या लॉजमध्ये नेले जाते. दिवस रात्री हे समान दृष्य दिसते. अशावेळी हाकेच्या अंतरावर वाहतूक नियमन करणारे पोलीस, गाड्या अडवून चलन फाडणारे पोलीस, सीआरपीएफ कॅम्पातील चौकीतून परिसरावर लक्ष ठेवणारे जवान असे हे समाजातील चुकीच्या गोष्टींना आळा घालणारे ‘रक्षक’ असताना, अवैध आणि चुकीच्या पद्धतीने फोफावलेल्या या वेश्या व्यवसाकडे मात्र ठरवून दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय आणि संताप व्यक्त होत आहे.

ज्या ज्या ठिकाणी ह्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असतात तिथून जवळपासच बस थांबे आहेत. अशावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या नित्याच्या वावराने सामान्य महिला देखील जेव्हा बस थांब्याकडे जात असतात किंवा बस थांब्याजवळ थांबतात, तेव्हा त्यांच्याकडेही विचित्र नजरेने पाहणारे पाहतात. यातून संबंधित महिलेची कुचंबना होती, ही बाब सर्वाधिक गंभीर आहे. संबंधित महिलेला होणारा मानसिक त्रास शब्दात सांगता येणारा नसतो.

  • ज्या ज्या ठिकाणी ह्या महिला उभा राहतात, हा संपूर्ण परिसर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, तर काही भाग पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील आहे. समाजिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने फोफावत असलेला महामार्गालगतचा हा वेश्या व्यवसाय गेल्या दोन तीन वर्षांत अधिक वेगाने वाढतोय, दिवसेंदिवस वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची येथील संख्या आणि ठिकाणे वाढताहेत. एकीकडे गुन्हेगारी रोखण्यात कमी पडणारे पोलीस प्रशासन जेव्हा समोर उघड्या डोळ्यांनी दिसणारा अवैध वेश्या व्यवसाय देखील थांबवू शकत नाही, तेव्हा निश्चितच पोलिसांच्या भूमिका, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

कायद्याचा धाक ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना उघड्या डोळ्यांनी दिसणारे अवैध धंधे कमी करता येत नाही, तेव्हा पोलिसांबद्दलचा आदर आणि धाक जनतेच्या नजरेतून अपोआप कमी होऊ लागतो. पुणे-मुंबई महामार्गावर दिवसरात्र सुरू असलेला हा वेश्या व्यवसाय याचे उत्तम उदाहरण आहे. आता पोलीस नेमके आपले स्थान लोकांच्या नजरेत काय ठेवू इच्छितात, हे पोलिसांवर अवलंबून आहे. बाकी वेश्या व्यसाय करणाऱ्या महिलांसाठी महामार्ग ही अधिकृत जागा असू शकत नाही, हे सांगायला कायदेतज्ज्ञाची गरज नाही.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

Next Post

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
Clarify timeline for Pune-Lonavala third fourth railway lines MP Shrirang Barne directs railway administration

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

August 19, 2026
Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.