व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 3, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनानगर (प्रतिनिधी) : नियती किती कठोर असू शकते याचा हृदयद्रावक अनुभव मावळ तालुक्यातील बेडसे गावातील शालन सोमनाथ दहिभाते यांना आला आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी पतीचे निधन होऊन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्या दु:खातून सावरत संसार उभा करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत त्यांचे घर पूर्णतः जळून खाक झाले आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. घर कच्च्या स्वरूपाचे असल्याने तसेच उष्णतेमुळे आग झपाट्याने पसरली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग इतकी भीषण होती की संपूर्ण घर काही वेळातच राख झाले.

या आगीत घरातील धान्य, तांदूळ, कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर आवश्यक वस्तू जळून खाक झाल्या. अनेक वर्षांच्या कष्टाने उभा केलेला संसार काही क्षणांत नष्ट झाल्याने शालन दहिभाते यांच्यावर पुन्हा एकदा मोठे संकट कोसळले आहे. पतीच्या निधनानंतर मोठ्या जिद्दीने संसार सांभाळत असलेल्या या महिलेपुढे आता निवाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

घर जळताना पाहून शालन दहिभाते यांचा आक्रोश उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. एक वर्षापूर्वी पती गमावला आणि आता डोळ्यासमोर संसार जळताना पाहावा लागला,अशी हळहळ ग्रामस्थ व्यक्त करत होते. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घर उद्ध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस प्रशासन तसेच वीज वितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विभागांकडून पंचनामा करण्यात आला असून नुकसानीचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, गावातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे करण्यास सुरुवात केली असून सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला आधार द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बेडसे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

Next Post

मावळच्या ऐतिहासिक वारशात भर… विसापूर किल्ल्याच्या आडवाटेला आढळले प्राचीन भुयार, संशोधन होणं गरजेचं

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Adding to Maval historical heritage Ancient tunnel found at entrance of Visapur Fort research needed

मावळच्या ऐतिहासिक वारशात भर... विसापूर किल्ल्याच्या आडवाटेला आढळले प्राचीन भुयार, संशोधन होणं गरजेचं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
Clarify timeline for Pune-Lonavala third fourth railway lines MP Shrirang Barne directs railway administration

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

August 19, 2026
Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.