व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या ऐतिहासिक वारशात भर… विसापूर किल्ल्याच्या आडवाटेला आढळले प्राचीन भुयार, संशोधन होणं गरजेचं

भटकंती करताना "सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानला" लागला शोध

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 23, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Adding to Maval historical heritage Ancient tunnel found at entrance of Visapur Fort research needed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात पवन मावळ विभागात असलेल्या किल्ले विसापूर गडाच्या उभ्या कातळात आणि अवघड ठिकाणी कोरलेल्या एका अपरिचित असं प्राचीन भुयार भटकंती करताना मावळातील दुर्ग- संवर्धन करणाऱ्या “सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानला” आढळले आहे. हे भुयार कोरीव असून नेमकं कशासाठी खोदलं गेलं असेल? कोणी खोदलं असेल? असं कुतहूल निर्माण करणारं आहे. तसेच हे भुयार इतिहास अभ्यासकांना संशोधन करण्यासाठी मोठं पर्वणी ठरणारं आहे.

मावळातील विसापूर गडाच्या पायथ्यालगत असलेल्या मालेवाडी याठिकाणाहून दुर्गसेवक सोमनाथ म्हसे, अनंता गोरे, सागर परब, ओंकार केदारी, दगडू मरगळे, खंडू धुमाळ, सोमनाथ सातकर, राहुल बोरकर, नवनाथ केदारी दक्ष काटकर, दत्ता भोकटे हे आडवाटेने विसापूर गडावर जात असताना त्यांना हे प्राचीन आणि अपरिचित भुयार आढळलं. आतमध्ये गेल्यावर सुरवातीला हे भुयार लांब त्यानंतर खोल आणि मग पूढे सरळ त्यानंतर पुन्हा खोल आणि डाव्या आणी उजव्या बाजूला गेलेलं आढळलं. हे भुयार पाण्याच्या शोधासाठी किंवा आतमध्ये ध्यानधरणेसाठी बनवलं गेलं असेल का? नेमकं हे कोणत्या काळातील असावं? असे अनेक प्रश्न हे भुयार पाहून डोळ्यासमोर उभे राहत आहे.

असं आहे हे भुयार
या भुयाराचे खोदकाम करताना वापरले गेलेल्या छिन्नी हातोड्याच्या खुना स्पष्ट दिसतात. या भुयाराची रुंदी आणि उंची 3 बाय 3 फूट असून ते 50 फूट लांब चौकोनी आकाराचे कोरीव आहे. पुढे हे भुयार खालच्या बाजूला 5 फूट खोल असून उजव्या बाजूने पुन्हा 6 फूट लांब आहे. आणि पुढे ते डाव्या बाजूला 12 फूट लांब आहे. पुढे हे भुयार 3 फुट खोल असून 4 फुट लांब आहे. आणि शेवटला दोन्हीही बाजूला 10-10 फुट लांब आहे. भुयारात पाणी आणि चिखल आहे.

शेकडो वर्षांत कुणीही न पाहिलेली भुयारे आपल्या मावळ तालुक्यातील लोहगड, विसापूर आणि तुंग गडांच्या कातळकड्याला पूर्वमध्ययुगात खोदलेली आहेत. नव्याने शोध केलेल्या विसापूर दुर्गाच्या कातळ्यातील हे भुयार निश्चितच मावळच्या इतिहास संशोधकांकडून निष्कर्ष काढणारे ठरेल हा विश्वास वाटतो. तुंग गडाचे एक भुयार 147 फूट लांबीचे असून आतमध्ये उजव्या बाजूस ध्यानधारनेसाठी दोन कक्ष / दालन खोदलेली आहेत. सदर भुयारांचा उपयोग निश्चितच विपश्यना – ध्यानधारणेसाठी दुर्ग बांधणीच्या आधी केला गेलेला संशोधनाअंती निदर्शनास येतो. सफर 361 किल्ल्याची सामाजिक प्रतिष्ठानचा हा शोध महाराष्ट्रातील अनेक अबोल भुयारांना बोलके करेल. – डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Next Post

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
meeting held at Collectorate office regarding proposed MIDCs at Baur Brahmanwadi Karunj in maval MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.