Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यातील बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न संपन्न झाली. शुक्रवारी (दि. २२) पुणेतील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासंदर्भात शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सन २००६ मध्ये बौर व शेजारील गावांतील सुमारे ११०० एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून संपादित करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया शासनामार्फत सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्या विविध मागण्या माझ्याकडे मांडल्या होत्या. त्याअनुषंगाने बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत चर्चा करण्यात आलेले मुद्दे :
1. ज्या शेतकऱ्यांना प्रकल्पासाठी संमतीने जागा द्यावयाची आहे त्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला व परतावा म्हणून २०% औद्योगिक क्षेत्र जागा मिळावी
2. ज्या शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नसतील त्यांच्या जमिनी प्रकल्पातून वगळण्यात याव्यात किंवा त्यांना पर्यायी ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावी
3. स्थानिक भूमिपुत्रांना कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात
4. जमिनीवरील अस्तित्वातील घरे, बांधकामे व झाडांना वाढीव मोबदला मिळावा
5. नागरी वसाहतीस रस्ते , पाणी , आरोग्य सुविधा यांसह आवश्यक सुविधांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी आमदार सुनील शेळके, MIDC प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले तसेच बौर-ब्राम्हणवाडी-करुंज गावांतील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर