Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी, बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि यशाचा गौरव करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका व पंचायत समिती शिक्षण विभाग मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’ गुरुवारी (दि. २८ मे) वडगाव मावळ येथे उत्साहात पार पडला.
यावेळी आमदार सुनील शेळके, प्रा. गणेश शिंदे, विठ्ठल शिंदे, गणेश ढोरे, सभापती सुनिता येवले, दिपाली हुलावळे, नगराध्यक्षा अबोली ढोरे, गटशिक्षणाधिकारी शिल्पा रोडगे तसेच सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शिक्षण हेच प्रगतीचे मुख्य साधन आहे” या भावनेतून मावळमधील प्रत्येक विद्यार्थी स्पर्धेच्या युगात सक्षम व अग्रेसर राहावा, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे, असे आमदार सुनील शेळके म्हणाले. कार्यक्रमात प्रा. गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी मोलाचे विचार मांडले.
यावेळी विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजांवर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील शिक्षणासाठी अत्याधुनिक वाचनालय, ए.आय. कार्यशाळा तसेच स्पर्धा परीक्षा पुस्तकांची उपलब्धता करून देण्याबाबत आश्वासित करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष सुशांत बालगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे