व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

फुगेवाडीतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची शासनाकडे मागणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 30, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विषारी दारू प्यायल्याने दापोडीतील फुगेवाडीतील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांना स्वतंत्र युनीट स्थापन करावे. शहरातील अवैध धंदे, त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलिसांना दिली आहे. या मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दापोडीतील फुगेवाडीत एकाचदिवशी सात जणांचा मृत्यू झाला आहे. खासदार बारणे यांनी दापोडी पोलीस ठाण्यात भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडून घटनेचे सविस्तर माहिती घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अधीक्षक अतुल कानडे यावेळी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, ही गावठी दारु हडपसर येथील लमान तांडा येथे बनवून विविध विभागात पाठवली जात होती. परदेशी नावाच्या व्यक्तीने सिंग, राठोडला दारु दिली. त्यात केमिकल मिसळण्यात आले. त्याचे प्रमाण जास्त असल्याने दारु विषारी झाली. तिचे प्राशन केल्याने पिंपरी-चिंचवडमधील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तीघे गंभीर जखमी आहेत. पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दापोडीतील मृत्यू झालेले नागरिक गरीब, झोपडपट्टीत राहणारे आहेत. स्वस्तामध्ये दारु मिळत असल्याने त्यांच्याकडून घेतली जात असल्याचे दिसते.

पिंपरी-चिंचवड शहर वाढत आहे. शहरात बाहेरील नागरिकही मोठ्या प्रमाणात आले आहेत. काम न करणाऱ्या लोकांकडून अवैध धंदे केले जातात. शहरात अवैध धंदे सुरु आहेत. या धंद्यावर नियंत्रण आणावे. त्यावर कारवाईसाठी स्वतंत्र युनीट निर्माण करावे. यापुढे अशा घटना घडू नयेत, याची खबरदारी घ्यावी. अवैध धंदे, या धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


dainik maval jahirat

Previous Post

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next Post

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.