व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून चांदीच्या मुकुटासह मुद्देमाल हस्तगत

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2026
in ग्रामीण, लोकल, शहर
Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकातील श्री तुळजा भवानी मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट चोरणारे आणि इंदुरीचे ग्रामदैवत श्री कडजाई मंदिरातील दानपेटी फोडणारे दोन अट्टल गुन्हेगारांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने खेड तालुक्यातील चाकण परिसरातून अवघ्या ४८ तासांच्या आत जेरबंद केले. पथकाने आरोपींकडून सव्वा किलो चांदीच्या मुकुटासह रोख रक्कम हस्तगत केली आहे.

शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास इंदुरी गावातील कडजाई मातेच्या मंदिराचे कुलुपे तोडून, कडीकोयंडा उचकटून मंदिरात प्रवेश करून मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेल्या दानपेटीचे कुलुप तोडून त्यामधील भाविकांनी दान केलेली अंदाजे ७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली होती. तसेच, तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकातील श्री तुळजा भवानी देवीचा चांदीचा मुकुट तळेगाव दाभाडे पोलिसांनी हस्तगत करुन नेमका याच दिवशी मंदिरास सुपूर्द केला होता आणि पूर्नस्थापनेनंतर २४ तासांच्या आत मुकुट पुन्हा चोरीस गेल्याने परिसरात मोठी खळबळ माजली होती.

इंदुरी येथील श्री कडजाई मंदिरातील दानपेटीतील ऐवज चोरीप्रकरणी वनिता घनश्याम नाणेकर/गुरव (५२, शिवशक्ती चौक, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी पथकास तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या प्रकरणी तपास पथकाने उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला.

त्यानुसार, खेड तालुक्यातील वाकी फाटा येथून कुणाल बाळु विर (२३, सुंबरेनगर, चाकण, ता. खेड, जि-पुणे) आणि दुसरा आरोपी लोबो उर्फ सुर्या श्रीमंतहो दास (२६, कडाचीवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यास रविवारी (दि. १४) चाकण परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी पोलीस पथकाने एकूण १ लाख २८ हजार रुपये किंमतीचा १ किलो २५० कि. ग्रॅ. वजनाचा चांदीचा मुकुट आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तपासाअंती अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तळेगाव, एमआयडीसी आणि दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांनुसार त्यांनी घरफोडीसह इतरही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. अटकेतील दोन्ही आरोपींना वडगाव मावळ न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परीमंडळ ४च्या पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहा. पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक दिपक खरात, हवालदार अनंत रावण,वसीम शेख, अंमलदार ज्ञानेश्वर सातकर, विनायक शेरमाळे, रमेश घुले, रोहित माने, भीमराव खिलारे, गणेश दरदंले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?
– महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’
– भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

Next Post

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mp-shrirang-barne

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.