व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल, उरण, नेरळ आणि कर्जत या भागातील विद्युत विषयक समस्यांबाबत पनवेल महापालिकेत विद्युत विभागाची सोमवारी आढावा बैठक घेतली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 19, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
mp-shrirang-barne

Photo Courtesy : PR / Mp Shrirang Barne


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, उरण, नेरळ आणि कर्जत या भागातील वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा. भविष्यात दहा ते बारा तास वीज जाण्यासारखा घटना घडू नयेत.  ग्राहकांना नाहक त्रास होऊ नये. यासाठी डीपीची क्षमता वाढवावी, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल, उरण, नेरळ आणि कर्जत या भागातील विद्युत विषयक समस्यांबाबत पनवेल महापालिकेत विद्युत विभागाची सोमवारी आढावा बैठक घेतली.

या बैठकीला विद्युत अधीक्षक अभियंता दिपक पाटील, अधीक्षक अभियंता धिरज बिक्कड, कार्यकारी अभियंता पनवेल शहर जितेंद्र माने, कार्यकारी अभियंता पनवेल ग्रामीण देशमुख, कार्यकारी उप अभियंता संजय ठाकूर, पनवेल शहर उप कार्यकारी अभियंता पनवेल शहर श्रीनिवास बोबडे, उप कार्यकारी अभियंता कर्जत चंद्रकांत केंद्रे, उप कार्यकारी अभियंता खालापूर अमित कुरंगळे, उप कार्यकारी अभियंता खोपोली, वाघमोडे, नगरसेवक श्री. रामदास शेवाळे, नगरसेवक प्रथमेश सोमण, नगरसेविका सायलीताई तुकाराम सरक, शिवसेना कळंबोली शहर प्रमुख श्री तुकाराम सरक, जगदीश ठाकूर,युवासेना उत्तर पनवेल जिल्हा प्रमुख, रोशन पुजारी भरत जाधव, परमेश्वर काळे, उपस्थित होते.

यावेळी पनवेल शहरातील कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना खासदार बारणे यांनी स्पष्ट सूचना दिल्या. तसेच या बैठकीत तिन्ही विभागांतील वीज प्रवाहित करण्याच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

खासदार बारणे म्हणाले, मागील आठ दिवसांपूर्वी पनवेल शहरी भागात वीजेची समस्या निर्माण झाली होती. दिशा कमिटीच्या बैठकीत विद्युत विषयक कामांना सूचना देण्याच्या सूचना दिल्या जातात. राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्वात दिला जातो. ग्राहक वाढतात तेथे सबस्टेशन वाढविले पाहिजे. त्यासाठी केंद्र, राज्य शासनाकडून मोठा निधी मिळतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध झाल्या आहेत. शहरी भागात चार ठिकाणी आणि ग्रामीण भागात तीन ठिकाणी सबस्टेशन उभारण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यात त्याचे काम पूर्ण होईल. त्यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही.

पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. कामोठे येथे पाच केव्हीचे विद्युत उपक्रेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. २२० केव्हीचे उपकेंद्र चालू आहे. त्याचा खारगरला फायदा होईल. पनवेल शहरी भागात अंडरग्राऊड केबलचा १५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. शहरात शंभर टक्के अंडरग्राऊड केबल होईल. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत होणार नाही. डीपीची क्षमता वाढवावी. भविष्यात ग्राहकांना वीज समस्येला सामोरे जावे लागू नये. वीजपुरवठा खंडीत झाल्यास तत्काळ दुरुस्त करावा.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?
– महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’
– भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

Next Post

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.