व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 19, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने डोळ्यांत साठवून विवाहाच्या तयारीत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा लोहगड किल्ल्यावर पाय घसरून दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अगरवाल (रा. लोढा, गहुंजे, ता. मावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Novel NIBR Ads

केतनचा विवाह येत्या १४ तारखेला जयपूर येथे एका आलिशान पॅलेसमध्ये थाटामाटात होणार होता. या विवाह सोहळ्याची सर्व जय्यत तयारी पूर्ण झाली होती. लग्नासाठी विमान तिकिटेही काढण्यात आली होती. याच आनंदाच्या वातावरणात, गुरुवारी केतन आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. किल्ला पाहताना आणि छायाचित्रे (सेल्फी) काढत असताना अचानक केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. लोणावळा ग्रामीण पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ आणि ‘वन्यजीव रक्षक मावळ’ या संस्थांच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत दुर्गम आणि कठीण भौगोलिक परिस्थिती असतानाही बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या बचावकार्यात आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, सचिन गायकवाड, विशाल पिसे, सागर दळवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना कराळे, राजू कडू, योगेश दळवी, महेश मसणे आणि सुनील गायकवाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती
– मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?
– महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’
– भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

Next Post

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maharashtra-police

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
crime-arrested

Lonavala Crime : लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

June 19, 2026
maharashtra-police

महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 19, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

Lohagad Fort Accident : सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण ; लोहगड किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

June 19, 2026
mp-shrirang-barne

वीज समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश

June 19, 2026
Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.