व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या विस्तारीकरणासह उन्नत मार्गाच्या कामाला आता गती मिळाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 20, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Talegaon Chakan Shikrapur Highway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या विस्तारीकरणासह उन्नत मार्गाच्या कामाला आता गती मिळाली आहे. या कामाच्या कंत्राटदार कंपनीबरोबर अंतिम करार करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून (एमएसआयडीसी) सुरू आहे. ती लवकरच पूर्ण होऊन या प्रकल्पाचे काम सुरू होण्याच्या दिशेने पावले पडणार आहेत.

  • तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा महामार्ग सध्या दुपदरी आहे. जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे. यामुळे छोट्या वाहनांसह अवजड वाहनांची वाहतूकही त्यावरून मोठ्या प्रमाणात होते. या महामार्गावरून रोज ४० हजार ८३९ प्रवासी वाहने धावतात. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी या महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला. राज्याच्या मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात या प्रकल्पाला मंजुरी दिली. हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारने ‘एमएसआयडीसी’वर सोपविली आहे.

महामंडळाने या प्रकल्पासाठी निविदा काढल्या होत्या. त्यात माँटेकार्लो या कंपनीला हे काम मिळाले आहे. या कंपनीबरोबर अंतिम करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पातील तळेगाव ते चाकण हा २४ किलोमीटरचा चौपदरी उन्नत मार्ग असेल आणि त्याखाली जमिनीला समांतर चौपदरी महामार्ग असेल. उर्वरित चाकण ते शिक्रापूर हा सहापदरी मार्ग असेल. हा प्रकल्प एकूण ५३.२ किलोमीटरचा असेल आणि त्यासाठी ६ हजार १५० कोटी रुपये खर्च येणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने त्यावर पथकर आकारणी केली जाणार आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्प
तळेगाव ते चाकण – चौपदरी महामार्ग व उन्नत मार्ग
चाकण ते शिक्रापूर – सहापदरी महामार्ग
एकूण लांबी – ५३.२ किलोमीटर
एकूण खर्च – ६ हजार १५० कोटी रुपये
भूसंपादनाची आवश्यकता – ३८.७९ हेक्टर

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. या कामाच्या कंत्राटदार कंपनीबरोबर अंतिम करारावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा करार झाल्यानंतर संबंधित कंपनी प्रकल्पासाठी बँकांकडून कर्ज उभारणी करेल. पुढील सहा महिन्यांत भूसंपादन होऊन या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. – ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआयडीसी

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा
– बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल
– महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

Next Post

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.