Dainik Maval News : वाहनांना काळ्या काचा, बिना नंबर प्लेटच्या दुचाकी चालवणे, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर गाड्यांना बसवणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभे करणे, असे प्रकार करणार्या तब्बल १०५ जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी गुरुवारी (दि.१८) कारवाई करत तब्बल एक लाख तीन हजार रुपयांचा दंड केला आहे. लोणावळा शहरचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोणावळा शहरामध्ये अनेक चारचाकी वाहने ही काळ्या काचा करून चालवली जातात, अनेक तरुण मुले गाड्यांच्या नंबर प्लेट काढून दुचाकी वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले होते, अशा वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करत कर्णकर्कश आवाज करणारे व फटाके वाजवणारे सायलेन्सर असणाऱ्या दुचाकी गाड्यांचे सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले. तसेच नो पार्किंगमध्ये रस्त्यावर वाहने उभी करत रहदारीला अडथळा निर्माण करणारी वाहने अशा प्रकारच्या एकूण १०५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
लोणावळा शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक चमन शेख, पोलिस हवालदार अनिल शिंदे, पोलिस हवालदार सचिन कडाळे, पोलिस कॉन्स्टेबल फाळके, पोलिस कॉन्स्टेबल शेख, पोलिस कॉन्स्टेबल शितोळे, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे, होमगार्ड व वॉर्डन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा
– बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल
– महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर



