Dainik Maval News : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनई बोडके वाडी परिसरात इंद्रायणी नदीत बुडाल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णा बोरा (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून, तो आकुर्डी प्राधिकरण येथे वास्तव्यास होता. तो मूळचा नेपाळमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

इंद्रायणी नदीच्या पात्रात एक तरुण बुडाल्याची माहिती मिळताच देहूरोड पोलीस आणि स्थानिक पोलीस पाटील यांनी तत्काळ बचाव पथकांशी संपर्क साधला. त्यानंतर ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ आणि ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ यांच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
नदीच्या प्रवाहात आणि प्रतिकूल परिस्थितीतही रेस्क्यू जवानांनी अथक प्रयत्न करत कृष्णा बोरा याचा मृतदेह शोधून बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या बचाव मोहिमेत निलेश गराडे, भास्कर माळी, विनय सावंत, विकास दोड्डी, ॲड. शुभम काकडे, शाहरुख सय्यद आणि रोहन भसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, घटनेचा पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया देहूरोड पोलीस करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा
– बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त ; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल
– महत्वाची बातमी ! पुणे जिल्ह्यात ७४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या जाहीर





