व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात मनसे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे मार्गदर्शनानुसार उपाध्यक्ष सुनील सावळे यांनी निवेदनाद्वारे प्रश्न उपस्थित केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2026
in लोकल, ग्रामीण
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात मनसे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे मार्गदर्शनानुसार उपाध्यक्ष सुनील सावळे यांनी निवेदनाद्वारे प्रश्न उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता राठोड साहेब यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी मावळ तालुका देहूरोड मनसे उपाध्यक्ष मोजसभाई दास, उपाध्यक्ष आकाश पारखी, उपाध्यक्ष अनिल लालगुडे तसेच ज्ञानेश्वर वाळुंजकर, मारुती बैकर, मुकेश रजपूत, गणेश सुतार उपस्थित होते.

काय आहे निवेदन?
कार्ला फाटा ते मळवली रस्त्याचे काम सध्या अत्यंत संत गतीने सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्ग हा दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असून शाळेतील मुले, दूध व्यवसायिक कामगार, शेतकरी तसेच पर्यटक या मार्गाचा वापर करतात. हा रस्ता कार्ला फाट्यावर फक्त पन्नास मीटरचा आरसीसी पॅचवरच अर्धवट थांबला गेला आहे. तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली असून काही ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

पावसाळ्यात यामुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवली असून मुंबई-पुणे महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. म्हणून सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून रस्त्याचे काम तात्काळ गतीने सुरू करून निश्चित कालावधीत काम पूर्ण करण्यात यावे. तोपर्यंत तात्पुरते खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करण्यात यावा. अपघात टाळण्यासाठी आवश्यक ते सूचना फलक व सुरक्षा उपयोजना राबविण्यात यावी. निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी. अन्यथा नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

Next Post

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.