व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव मावळ हे तालुक्याचे मुख्य महसुली केंद्र असल्याने येथे दर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2026
in लोकल, शहर
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ शहरात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दिवशी होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक,व्यापारी आणि महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव -कातवी शहराच्या भाजपाच्या वतीने वडगाव-कातवी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, पुढील सात दिवसांत वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Novel NIBR Ads

यावेळी गटनेते दिनेश ढोरे, अँड मृणाल म्हाळसकर, वडगाव शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष अतिश ढोरे, नगरसेवक संदीप म्हाळसकर, अनंता कुडे, विशाल वहिले, नगरसेविका राणीताई म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सरपंच नितीन कुडे, युवा चिटणीस विकी म्हाळसकर, युवा मोर्चा पदाधिकारी शंकर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडगाव मावळ हे तालुक्याचे मुख्य महसुली केंद्र असल्याने येथे दर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. आठवडे बाजारामुळे आजूबाजूच्या गावांमधून तसेच शहरातून महिला, वृद्ध, विद्यार्थी, लहान मुले आणि व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात येतात. याच मुख्य बाजारपेठ रस्त्यावरून जिल्हा व सत्र न्यायालय, तहसील कचेरी, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालय, पंचायत समिती आणि वडगाव रेल्वे स्टेशन येथे जाणाऱ्या नागरिकांचीही ये-जा सुरू असते.

बाजारपेठ परिसरात गुरुवारी चारचाकी वाहनांना मुक्त प्रवेश दिला जात असल्याने मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून वाहनचालकांमध्ये सतत वादविवाद होत आहेत. वाहनांच्या अनिर्बंध गर्दीमुळे अपघातांची शक्यताही निर्माण झाली आहे. भाजप महिला आघाडीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, दर गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारपेठ परिसरात पोलीस यंत्रणेमार्फत योग्य ठिकाणी बॅरिकेट्स लावून चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात यावी. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा.

यापूर्वीही याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. “प्रशासन वडगावकर नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे,” असा आरोप वडगाव शहर भाजपाने केला आहे. पुढील सात दिवसांच्या आत गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराचे आणि वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्यास, आठवडे बाजाराच्या दिवशी नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Novel NIBR Ads

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव
– Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला
– Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद
– मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


dainik maval jahirat

Previous Post

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

Next Post

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात 'मनसे'चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.