व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार शेळके यांनी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांचे विशेष अभिनंदन केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 2, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाच्या माध्यमातून वडगाव मावळ येथे (दि. ३१ जुलै) आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा तब्बल ३३२९ नागरिकांनी लाभ घेतला. तसेच, ३३७१ जिवंत सातबारा वाटप (साताबारा उताऱ्यावरील मृत खातेदारांची नावे कमी करणे आणि त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे नोंदवणे) करण्यात आले.

वडगाव मावळ येथे भेगडे लॉन्समध्ये झालेल्या या शिबिराचा शुभारंभ विभागीय आयुक्त शीतल तेली, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार सुनील शेळके, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, जिल्हा परिषदेच्या सभापती दीपाली हुलावळे, पंचायत समितीच्या सभापती सुनिता येवले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, रवींद्र भेगडे, तळेगावचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, लोणावळाचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, वडगावच्या नगराध्यक्ष अबोली ढोरे आदी उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री भेगडे यांनी याप्रसंगी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकारने शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, त्याबद्दल विशेष अभिनंदन केले. गोल्डन पीस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील जमिनीची जोपासना करण्याचे काम मावळवासीयांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून विशेषतः सुमारे १५०० कुटुंबांना घरासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच, शासनाचा निधी व सीएसआर निधीच्या माध्यमातून दिवाळीच्या आत त्यांना हक्काचे घरही देऊ, असे आश्वासन दिले. या वेळी विभागीय आयुक्त तेली, अप्पर जिल्हाधिकारी राऊत, प्रांताधिकारी नवले यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी आपत्कालीन परिस्थितीत सदैव तत्पर राहून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या मावळ तालुक्यातील शिवदुर्ग संस्था, वन्यजीव संरक्षण संस्था तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पीएमआरडीए बचाव पथक या संस्थांच्या प्रतिनिधींचा व जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार शेळके यांनी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच, यावेळी मीच थोडा कमी पडलो असल्याची कबुली दिली. तसेच, आता माजी मंत्री भेगडेही माझ्यासोबत आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी हे शिबिर ४ दिवसांचे करू, अशीही टिपण्णी केली. त्याचप्रमाणे माजी मंत्री भेगडे यांनीही जिल्ह्यात सर्वांत जास्त एसआयआरचे काम केल्याबद्दल तसेच तालुक्यातील एका आपत्तीग्रस्त कुटुंबाला मिळवून दिलेल्या शासकीय मदतीचे उदाहरण देत प्रांताधिकारी नवले व तहसीलदार देशमुख यांचे विशेष कौतूक केले.

योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी
1. महिला शेतकरी दर्जा प्रमाणपत्र वाटप : ११४
2. गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद : ३२८
3. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना : ४
4. शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे : १
5. तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा : २
6. घरकुल योजनेच्या लाभर्थ्यांसाठी विशेष तरतूद : ५१७
7. कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती : ४
8. शेतजमीनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी पूर्णपणे माफ : ३
9. राज्य शासकीय योजनांचा लाभ : २१८
10. केंद्र शासकीय योजनांचा लाभ : १०९
11. स्थानिक स्वाराज्य संस्थेच्या शासकीय योजनांचा लाभ : १६
12. इतर लाभ : २०१३
13. जिवंत सातबारा : ३३७१

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
– ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं


dainik maval jahirat

Previous Post

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Next Post

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.