व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

पार्किंग, स्वच्छतागृह, निवारा शेड, पिण्याचे पाणी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर; वनविभागाच्या आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 19, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री कोंडेश्वर देवस्थान येथे आमदार सुनील शेळके यांनी पवित्र श्रावणी सोमवारच्या शुभमुहूर्तावर भेट देऊन श्री कोंडेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून भाविक व पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसरातील विविध प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी दिल्या.

मावळ तालुका हा पुणे आणि मुंबईसह राज्यभरातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. लोणावळा, खंडाळा, भुशी धरण, पवना धरण यांसारख्या पर्यटनस्थळांसोबतच मावळातील विविध धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणांनाही पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामध्ये श्री कोंडेश्वर देवस्थान हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि श्रावण महिन्यात कोंडेश्वर परिसरात भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.

या पार्श्वभूमीवर परिसरातील उपलब्ध सुविधांची पाहणी करताना योग्य पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह, भाविक व पर्यटकांसाठी निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सीमाभिंत आदी सुविधांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सुनील शेळके यांनी दिल्या. तसेच वनविभागाच्या अखत्यारीतील जागा व कामांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या तातडीने मिळवून विकासकामांचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

  • कोंडेश्वर परिसराला धार्मिक महत्त्वासोबतच पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याची मोठी देणगी लाभली आहे. परिसरातील धबधबे, हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पावसाळ्यात येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनालाही चालना मिळत असून, त्यातून स्थानिक नागरिकांच्या रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढण्यास मदत होत आहे. मात्र, वाढत्या पर्यटकसंख्येच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूत सुविधांचे नियोजन करणे आवश्यक आहे. भाविक व पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच मंदिर परिसर सुरक्षित आणि सुसज्ज राहावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर आमदार सुनील शेळके यांनी भर दिला.

मावळच्या पर्यटनविकासाला चालना देताना केवळ लोणावळा किंवा भुशी धरणापुरते पर्यटन मर्यादित न ठेवता तालुक्यातील धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कोंडेश्वरसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन भाविक आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा पाहणी दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे.

मावळातील पर्यटन वाढीसोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी कोंडेश्वर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यास आमदार सुनील शेळके यांनी प्राधान्य दिले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
–
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– 
टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका

–
शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– 
महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद


dainik maval jahirat

Previous Post

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

Next Post

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.