व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

पत्रकार विमा शिबिरात ८० हून अधिक पत्रकारांचा सहभाग; वैद्यकीय विमा, उपचार सवलत आणि पत्रकार भवनासाठीही सहकार्याची ग्वाही

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ, दि. २० (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम आज राबविण्यात आला. मराठी पत्रकार संघ, मावळ तालुका, भारतीय टपाल खाते आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार विमा शिबिरात तालुक्यातील ८० हून अधिक पत्रकारांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या अपघाती विमा सुरक्षा कवचाचा लाभ घेतला.

शासकीय विश्रामगृह, वडगाव मावळ येथे झालेल्या या शिबिरास उद्योजक सुधाकर शेळके आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, टपाल विभागाचे पुणे ग्रामीण सहायक अधीक्षक सुखदेव मोरे, वडगाव मावळ टपाल कार्यालयाच्या शाखाधिकारी स्नेहल उमरजकर, मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुदेश गिरमे, तालुकाध्यक्ष रामदास वाडेकर, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष विलास भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोठे आहे. पत्रकारांनी सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत जनहिताचे विषय पुढे आणले आहेत, असे गौरवोद्गार सुधाकर शेळके यांनी काढले. मराठी पत्रकार संघाने हाती घेतलेल्या प्लास्टिकमुक्त मावळ आणि नशामुक्त मावळ या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

पत्रकारांना अपघात विमा योजनेबरोबरच वैद्यकीय विमा संरक्षण मिळावे, तसेच वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांमध्ये भरीव सवलत मिळावी, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सुधाकर शेळके यांनी दिली. तसेच मावळ तालुक्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठी पत्रकार संघाने तालुक्यातील सर्व पत्रकारांचे हित लक्षात घेऊन काम करावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी केली. संघटनेच्या सभासदांसोबतच इतर पत्रकार संघटनांचे सभासद असलेल्या पत्रकारांनाही विविध चांगल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

टपाल खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विमा आणि बचत योजनांची सविस्तर माहिती पुणे ग्रामीण सहाय्यक अधीक्षक मोरे यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी अशा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

विठुरायाच्या पंढरपूरनंतर संत तुकाराम महाराजांच्या मावळ तालुक्यात पत्रकारांसाठी अपघात विमा संरक्षण योजना राबविण्यात येत असल्याचा आवर्जून उल्लेख तालुकाध्यक्ष रामदास वाडेकर यांनी केला. प्लास्टिकमुक्त मावळ आणि नशामुक्त मावळ या दोन महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमांसाठी मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आमदार सुनील शेळके यांचे विशेष आभार मानले.

या विमा शिबिराच्या माध्यमातून पत्रकारांना दहा लाख रुपयांपर्यंतचे गंभीर अपघाती विमा कवच तसेच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत अपघाती विमा संरक्षण मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासोबत पोस्ट ऑफिस बचत खाते, डेबिट कार्ड आणि चेकबुक आदी सुविधांचीही माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदेश गिरमे यांनी केले. विवेक इनामदार यांनी आभार मानले, तर विशाल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. अपघात विमा सुरक्षा कवच उपक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघ मावळ तालुकाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिरासाठी डाक विभागाचे रोहित कोळी, प्रथमेश आगाव, यशराज जाधव, बालाजी पवळे, हनुमंत जॉर्डन, लक्ष्मण कुटे, अशोक मोरे, शिवानंद इंगोले, वैष्णवी कोपरकर , भूषण लांघी यांचे विशेष सहकार्य लाभले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच
– मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन
– तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू
– कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

Next Post

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.