व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

“आपला बाप्पा आपणच बनवूया, पर्यावरण वाचवूया!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 7, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ आणि लायन्स क्लब ऑफ कामशेत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवशंकर गार्डन मंगल कार्यालय, कामशेत येथे झालेल्या या शिबिरात शहरातील सहा शाळांमधील तब्बल १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

“आपला बाप्पा आपणच बनवूया, पर्यावरण वाचवूया!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. प्रसिद्ध मूर्तिकार अतिष थोरात यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीची विविध तंत्रे समजावून सांगत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद घेतला.

शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींचा वापर वाढवून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण रोखणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य आयोजकांकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वजीत बेडगे,ज्ञानेश्वर गायकवाड,दिपाली ठोबरे, सीमा गुंजाळ प्रताप गुंजाळ, मोहन वाघमारे, राजू अग्रवाल , बाळासाहेब जमादार, केदार डाखवे आणि सीमा देव उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना चेतन वाघमारे यांनी केली. सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले, तर आभार प्रदर्शन केदार डाखवे यांनी केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहा शाळांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे शिबिराचे वातावरण उत्साहपूर्ण झाले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

Next Post

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.