Dainik Maval News : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या मान्यतेने मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल, गहुंजे यांच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळांमधून तब्बल ४५० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बुद्धिमत्तेचे, एकाग्रतेचे आणि रणनीतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. विविध वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेला खेळाडू, शिक्षक व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या आयोजनासाठी ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त व खजिनदार साहेबराव बोडके, व्यवस्थापकीय संचालिका सौ. पौर्णिमा बोडके, मुख्याध्यापिका विजिला राजकुमार, मावळ तालुका क्रीडा अधिकारी सुरेश काकड, मनोज स्वामी, विजयकुमार चिनय्या तसेच प्रशिक्षक शुभम चतुर्वेदी, गणेश फाळके व तनिष यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
स्पर्धेतील विजेते खेळाडू
१९ वर्षांखालील मुली :
🥇 खुशी रामचरण यादव (मेयरस हायस्कूल)
🥈 समृद्धी अनंता तारे(माऊंट सेन्टेन्स हायस्कूल)
🥉 आदिबा अब्दुल रकीब बागवान (व्ही पी एस हायस्कूल)
१९ वर्षांखालील मुले :
🥇 वीर भरत केदारी(मेयर्स हायस्कूल)
🥈 अक्षय उडपी(हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल)
🥉 जय जितेंद्र कदम(व्ही पी एस हायस्कूल)
१७ वर्षांखालील मुली :
🥇 आर्णा विनय सिंग(एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल)
🥈 मंजुश्री नितेश श्रीवास(माऊंट सेन्टेन्स हायस्कूल तळेगाव)
🥉 अनया मनोहर कालगुंडे(एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल)
१७ वर्षांखालील मुले :
🥇 समर्थवर्धन शामराव गायकवाड(पोद्दार इंटरनॅशनल स्कूल)
🥈 ऋतूज रविकिरण कुलकर्णी(पोद्दार इंटरनॅशनल स्कूल)
🥉 अर्णव अमित प्रभू(माऊंट सेन्टेन्स हायस्कूल तळेगाव)
१४ वर्षांखालील मुली :
🥇 अवनिता नारायण अय्यर(डी वाय पाटील हायस्कूल)
🥈 रिद्धी किरण ढगे(डी वाय पाटील हायस्कूल तळेगाव)
🥉 सिद्धी विनोदकुमार शिंदे(सरस्वतीविद्यामंदिर तळेगाव)
१४ वर्षांखालील मुले :
🥇 अभिज्ञ भुजंगराव शेळके(हॅचिंग इंटरनॅशनल स्कूल तळेगाव)
🥈 आराध्या साईनाथ अनेकर(बालविकास विद्यामंदिर तळेगाव)
🥉 हर्षिल मनुजा(कैवल्य विद्या निकेतन मावळ)
स्पर्धेतील विजेत्या व सहभागी खेळाडूंचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, तर्कशक्ती, निर्णयक्षमता आणि नियोजन कौशल्य विकसित होण्यास मदत होते, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
– विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
– लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास
