व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकसंचांचे वाटप

यावेळी सर्व शिक्षक वृंद कान्हे, समिती सदस्य, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व माथाडी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 28, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Distribution of books to students on occasion of birth anniversary of late Pandharinath Satkar kanhe maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिक्षणातून प्रगतीचा ध्यास घेत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर प्रतिष्ठान, मावळ यांच्या वतीने स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कान्हे येथे शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत इयत्ता चौथी व सातवीच्या एकूण १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तकसंचांचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधणे, त्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन व तयारीची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा व्यापक करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रतिष्ठानचा हा प्रयत्न उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.

या कार्यक्रमास माथाडी कामगार नेते तथा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा किशोर पंढरीनाथ सातकर, गटशिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे, शिक्षणविस्तार अधिकारी सुदाम वाळुंज , केंद्रप्रमुख निर्मला काळे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास मधुकर सातकर, खजिनदार व युवा उद्योजक अमोल पंढरीनाथ सातकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रसाद गंगाराम सातकर, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सुशांत दिलीप बालगुडे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले उपस्थित होते.

यावेळी सर्व शिक्षक वृंद कान्हे, समिती सदस्य, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व माथाडी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकेशिनी कोले यांनी केले. सूत्रसंचालन सुहास धस यांनी केले, तर आभार प्रदर्शन निर्मला काळे यांनी मानले.

स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या स्मृती जपत शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील भावी पिढी घडविण्याचा प्रतिष्ठानचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी असे उपक्रम प्रेरणादायी असून, “सेवा, संस्कार आणि शिक्षण हाच प्रगतीचा खरा मार्ग” हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर
– कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन
– वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय
– पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे


dainik maval jahirat

Previous Post

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Distribution of books to students on occasion of birth anniversary of late Pandharinath Satkar kanhe maval

स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकसंचांचे वाटप

October 28, 2026
Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

October 27, 2026
Ravindra Bhegade met with CM devendra fadanvis to request an early meeting regarding Pavana farmer

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

October 27, 2026
Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.