Dainik Maval News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मावळ तालुक्यातील श्री एकविरा देवी देवस्थान परिसरातील विकासकामे व आवश्यक भौतिक सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि.२५) वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या परवानगीअभावी रखडलेल्या पायथा मंदिर ते वाहनतळ या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम, वाहनतळ ते मंदिर पायऱ्यांचे रुंदीकरण, पायऱ्यांच्या बाजूने रेलिंग तसेच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे यांसारख्या आवश्यक कामांना लागणाऱ्या जागेसाठी तत्काळ परवानगी देण्याचे आदेश या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निर्णयामुळे ही सर्व कामे लवकरच मार्गी लागून निर्धारित वेळेत पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीस आमदार सुनील शेळके, नवी मुंबई महापौर सुजाता पाटील, वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे यांच्यासह संचालक मंडळ व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’
