व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विधान परिषद निवडणूक : कोकणात झटका तरीही राज्यात मविआचाच डंका, भाजप पराभवाचं चिंतन करणार, पाहा सर्व निकाल

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात 5 जागांसाठी झालेल्या निवडणूकीचे सर्व निकाल समोर आले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 3, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Maharashtra-Vidhan-Parishad-Election-Results

File Image


राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात 5 जागांसाठी झालेल्या निवडणूकीचे सर्व निकाल समोर आले आहेत. संपूर्ण निकालानंतर राज्यात कोकण वगळता भाजपाला सर्वत्र धक्का बसला आहे, तर महाविकास आघाडीचा मात्र चांगलाच डंका वाजला आहे. ( Maharashtra Vidhan Parishad Election 2023 Results )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

  • विधान परिषद निवडणूक निकालात भारतीय जनता पार्टीला केवळ कोकण मतदारसंघातील विजयावरच समाधान मानावे लागले आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकासआघाडी पुरस्कृत शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.  कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20,083 मते मिळाली, तर बाळाराम पाटील यांना 10,997 मते मिळाली. तर धनाजी पाटील यांना 1,490 मते मिळाली. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा इथे बहुमताने विजय झाला.

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाला धक्का बसला आहे. इथे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. भाजपाचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना इथे पराभवाचा धक्का बसणार असे दिसत आहे. अद्याप या जागेची मतमोजणी सुरु असल्याने अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला नाही. मात्र, धीरज लिंगाडे यांचा विजय जवळपास निश्चित आहे.

  • भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्येही काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार नागो गाणार यांचा काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात नागो गाणार यांना 8,211 मते मिळाली. तर, सुधाकर अडबाले यांना तब्बल 16,700 मते मिळाली. तर राजेंद्र झाडे यांना 3,358 मते मिळाली. सुधाकर अडबाले हे बहुमताने इथे विजयी झालेत.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे विक्रम काळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला आहे. विक्रम काळे यांना 23 हजार 580 मते मिळाली तर किरण पाटलांना 16 हजार 643 मते मिळाली. त्यामुळे विक्रम काळे यांचा 6 हजार 937 मतांनी विजय झाला.

  • नाशिक पदवीधर मतदारसंघातील रंगतदार नाट्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. इथे अपेक्षेप्रमाणे सत्यजित तांबे यांनी बाजी मारली आहे. सत्यजित तांबे यांना मतमोजणीत पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मते पडली. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते पडली. त्यामुळे सत्यजित तांबे या निवडणुकीत तब्बल 29 हजार 465 मताधिक्यांनी निवडून आले आहेत.

अधिक वाचा –

– शंभूराज देसाईंनी आमदार शेळकेंना दिलेलं आश्वासन पाळलं, मावळमधील धरणग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न
– केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा, देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारणार
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार


Previous Post

कौतुकास्पद! सुप्रिम इंडस्ट्रीज कंपनीच्या कामगारांकडून उर्सेतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत

Next Post

पुणे जिल्ह्यात 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lok-Adalat

पुणे जिल्ह्यात 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Livestock farmers take care of your livestock measures if symptoms of heatstroke in livestock

पशुपालकांनो.. पशुधनाची काळजी घ्या, पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ‘या’ उपाययोजना करा

May 13, 2026
Crime

पाहुणा म्हणून आला आणि घर लुटून गेला, तळेगावमधील धक्कादायक प्रकार

May 13, 2026
Sanskar Foundation provides support to tribal from Sai Village whose house was burnt down in fire

वणव्यात घर जळून खाक झालेल्या साई येथील आदिवासी बांधवाला ‘संस्कार’चा आधार

May 13, 2026
Bhumi Pujan of development works at Joshiwadi Thakarvasti in station area of ​​Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

May 12, 2026
maharashtra Govt decision Big relief for farmers stamp duty waiver for crop loans up to Rs 2 lakh

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सभासद शेतकऱ्यांना ३ हजार १५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

May 12, 2026
Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.