व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज! आता लोणावळ्यासाठी शिवाजीनगरहून 4 लोकल सुटणार, पाहा वेळापत्रक

पुणे स्थानकावरून लोणावळ्यासाठी एकूण 20 लोकल जात होत्या. त्यापैकी 1 लोकल आधीपासूनच येथून सुटत होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 7, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


सोमवारी (6 फेब्रुवारी) शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरील नव्या टर्मिनलचे उद्‌घाटन करण्यात आले. नव्या टर्मिनलमुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यापारी यांना मोठा फायदा होणार आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. तसेच पुणे रेल्वे स्थानकावर देखील यार्ड रिमोल्डिंगचे काम सुरू होणार असल्याने शिवाजीनगर स्थानकावरून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यामुळे आता शिवाजीनगर स्थानकावरून लोणावळ्यासाठी 4 लोकल सुटणार आहेत. पुणे स्थानकावरून लोणावळ्यासाठी एकूण 20 लोकल जात होत्या. त्यापैकी 1 लोकल आधीपासूनच येथून सुटत होती.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

असे असेल नवे वेळापत्रक

शिवाजीनगर ते लोणावळा

सकाळी – 6:35 वाजता
सायंकाळी – 5:15 वाजता
रात्री – 8:35 वाजता
रात्री – 9:05 वाजता

लोणावळा-शिवाजीनगर

दुपारी – 3:30 वाजता
सायंकाळी – 7:00 वाजता
सायंकाळी – 7:35 वाजता
रात्री – 10:35 वाजता

सदर टर्मिनसच्या उद्‌घाटनावेळी खासदार गिरीश बापट हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. तर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी शिवाजीनगर-तळेगाव लोकलला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमावेळी डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ मंडळ अभियंता विजयसिंह दडस, जोएल मैकेंजी, मनीष सिंह, स्थानक व्यवस्थापक संजय कुंभार, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर, लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांची उपस्थिती होती. ( Inauguration of new terminal at Shivajinagar railway station now There will be 4 rounds from Pune to Lonavala local )

अधिक वाचा –

– लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध हॉटेलमध्ये न्यूड पार्टी, पोलिसांच्या छाप्यात अश्लील नृत्य करणारे 53 जण ताब्यात
– मोठी बातमी! लोणावळा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी, 342 पोती गुटख्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात


dainik maval jahirat

Previous Post

सुनिलआण्णा शेळकेंची शिष्ठाई अयशस्वी, राहुल कलाटे यांनी बंडखोरी केलीच, उमेदवारी अर्जही भरला

Next Post

‘दादा हो… आता तरी दिवे लावा’, वडगाव शहर भाजपाची नगरपंचायतला विनवणी, निवेदनातून वडगावकरांचा अंत न पाहण्याचा सल्ला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Bjp

'दादा हो... आता तरी दिवे लावा', वडगाव शहर भाजपाची नगरपंचायतला विनवणी, निवेदनातून वडगावकरांचा अंत न पाहण्याचा सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.