व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : वंचितचं ठरलं, ‘फक्त हेच भाजपला रोखू शकतात’ असे सांगत जाहीर केला पाठिंबा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीबाबत वंचितचा मोठा निर्णय! ठाकरेंपासून फडणवीसांपर्यंत सर्वांनाच झटका

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 16, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Prakash-Ambedkar

File Image - Prakash Ambedkar


पुण्यातील ( Pune News ) कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभांच्या पोटनिवडणूकांकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. आधीच उमेदवारीवरुन रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर आता अनेक लहान मोठ्या पक्षाचे पाठींबे कुणाला, असणार यावरुन राजकारण रंगले आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने आपली भुमिका स्पष्ट करुन सर्वांनाच धक्का दिलाय. वंचितने चिंचवड पोटनिवडणूकीत राहुल कलाटे यांना पाठींबा देण्याचे ठरवले आहे. ( Chinchwad Assembly By Election Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi Support Rahul Kalate )

काय म्हटलंय वंचित बहुजन आघाडीने?

वंचित बहुजन आघाडीकडून याबाबत एक प्रेसनोट काढून पक्षाची भुमिका आणि निर्णय स्पष्ट करण्यात आला आहे.

“वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भात चर्चा  झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे, असे दिसतंय. परंतु काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा, असे विनंती पत्र आलेले नाही आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.

पहाटेच्या शपथविधीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशीर्वाद होता, असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बीजेपी बरोबर जाणार नाही, असा कुठेही खुलासा केलेला नाही.

पिंपरी चिंचवडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता आणि त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी, असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.

गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून बीजेपीला पिपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात, या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडमधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे.” असे पत्रक वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडून प्रसिद्ध करु शकते.

अधिक वाचा –

– कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : मतदानापूर्वी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी, वाचा संपूर्ण आदेश
– राहुल कलाटे उमेदवारीवर ठाम! चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीतून माघार घेण्यास नकार, तिरंगी लढतीने उडणार धुरळा


Previous Post

खंडाळा इथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू । Lonavla Crime

Next Post

वडगावमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी का घालू नये?

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval

वडगावमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी का घालू नये?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
Traffic congestion in Pawananagar market Police impose punitive action by installing jammers on 44 vehicles

पवनानगर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा त्रास ; पोलिसांकडून ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई

March 24, 2026
special tree plantation program held in Maval in presence of actor Sayaji Shinde

वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

March 24, 2026
Voter list will be accurate and transparent Special revision program in Maval assembly constituency

मतदारयादी होणार अचूक आणि पारदर्शक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ‘विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’

March 24, 2026
Ekvira-Devi

एकविरा देवीच्या यात्रेला जाणार असाल तर आधी ही बातमी वाचा ; देवीच्या चैत्री यात्रा उत्सवानिमित्त वाहतूकीत मोठे बदल

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.