व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना शिक्षण संकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न, पारंपारिक वेषातील बालगोपाळांनी वेधले सर्वांचेच लक्ष

पवना शिक्षण संकुलातील शिक्षक व विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्ला तिकोणा ते पवना विद्या मंदिर येथून ढोल ताशांच्या निनादात शिवज्योत आणण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 20, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Shiv-Jayanti-2023-Celebration

Photo Courtesy : Bharat Kale


शासनाच्या आदेशानुसार व संस्थेचे कार्यकुशल उपक्रमशील सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार पवना शिक्षण संकुलात रविवारी (19 फेब्रुवारी) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा “शिवजयंती महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ( Shiv Jayanti 2023 Celebration At Pavana Vidya Sankul In Pavananagar )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या प्रसंगी पवना शिक्षण संकुलातील शिक्षक व विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्ला तिकोणा ते पवना विद्या मंदिर येथून ढोल ताशांच्या निनादात शिवज्योत आणण्यात आली. शिवज्योत पवनानगर चौकात आल्यानंतर संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे व पर्यवेक्षिका निला केसकर व‌ परिसरातील नागरिक व माजी विद्यार्थी व सर्व शिक्षक यांनी जोरदार स्वागत केले.

त्यानंतर चौकातून लेझीम पथकावर मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे पर्यवेक्षिका निला केसकर व शिवव्याख्याते प्राध्यापक बाळा खांडभोर आणि सर्व अध्यापकांनी केले. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ वेषभूषा परिधान शिवरायांच्या जीवन चरित्राविषयी पोवाडा, पाळणा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत पाहुण्यांची मने जिंकली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी शिवरायां विषयी आपली मनोगते व्यक्त केली.

हेही वाचा – गुडन्यूज..! सोमवारपासून पुणे ते लोणावळा लोकल रेल्वेच्या आणखीन दोन फेऱ्या, पाहा नवीन वेळापत्रक

व्याख्याते बाळा खांडभोर यांचे शिव चरित्र्यावर भारदस्त आवाजात व्याख्यान झाले. यावेळी बोलताना खांडभोर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिव चरित्राचा आदर्श समोर ठेवून प्रयत्न करावेत. शिव चरित्राच्या प्रतेक पैलूवर अभ्यास केल्यास अपयश कधीच येणार नाही. यश नक्कीच मिळेल असा आशावादी संदेश विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन पवना शिक्षण संकुल माध्यमिक विभाग, कॉलेज विभाग व प्राथमिक विभागातील सांस्कृतिक विभागांनी केले. छञपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


Previous Post

आंदर मावळातील 40 गावांना जोडणारा जांभूळ रेल्वे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला, नागरिकांनी व्यक्त केले समाधान

Next Post

राजा शिवछत्रपती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश ढोरे; पाहा समितीची संपूर्ण कार्यकारिणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivjayanti-Utsav-Samiti-Vadgaon-Maval

राजा शिवछत्रपती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश ढोरे; पाहा समितीची संपूर्ण कार्यकारिणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhumi Pujan of development works at Joshiwadi Thakarvasti in station area of ​​Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

May 12, 2026
maharashtra Govt decision Big relief for farmers stamp duty waiver for crop loans up to Rs 2 lakh

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सभासद शेतकऱ्यांना ३ हजार १५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

May 12, 2026
Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.