व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव-चाकण मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल

ट्रकला चारचाकी घासून ट्रक चालकाला मारहाण करत लुटून पसार झालेल्या आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 8, 2023
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Talegaon-Dabhade-Police-Station

File Photo


ट्रकला चारचाकी घासून ट्रक चालकाला मारहाण करत लुटून पसार झालेल्या आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 6 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तळेगाव चाकण रोड मच्छी मार्केट च्या समोर ही घटना घडली.

याप्रकरणी फिर्यादी मुकेश रामनाथ यादव (वय 45 वर्षे, रा. बरीयारामपुर पो सोरोकटराबझार ता. हाडीया .जि. इलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी, गाडी क्रमांक एम.एच 14 एच.डब्लू. 2070 आय 20 वरील चालक आणि त्याचा मित्र यांच्यावर दिनांक 7 मार्च रोजी दुपारी पाऊणे दोन वाजता तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला. ( Truck driver beaten and robbed on Talegaon-Chakan road case registered in Talegaon Dabhade police )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 392, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारिख आणि वेळेला फिर्यादी त्यांचा टाटा ट्रक (क्रमांक जी.जे. 15 ए.व्ही. 9958) मधील माल मोशी गोडावून मध्ये उतरून चाकण तळेगाव गाव रोडने पनवेल कडे घेऊन जात होते. तेव्हा मार्गावरुन जात असताना तळेगाव दाभाडे मच्छी मार्केटचे समोर साधारण रात्री साडेआठ वाजता फिर्यादी हे आले असता फिर्यादीच्या ट्रकच्या पाठीमागून डाव्या बाजूने फिर्यादीत नमूद आरोपीने ट्रकच्या पाठी मागील डाव्या बाजूकडे त्यांची चारचाकी गाडी आय-20 उजव्या बाजूने घासून आरोपींने फिर्यादीला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले.

हेही वाचा – धक्कादायक! मुळशी तालुक्यातील नामांकीत पैलवानाचा तालमीत सराव करत असताना हार्ट अटॅकने मृत्यू

त्यानंतर फिर्यादी बसलेल्या ड्रायव्हर सीटकडे येऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरायला सांगितले. तसेच ट्रकमुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले असे सांगत फिर्यादीला ट्रकमधून खाली ओढून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यातील एका आरोपीने फिर्यादीकडे असलेला रुपये 5000 किंमतीचा मोबाईल फोन बळजबरीने खिशात हात घालून काढून घेतला. तसेच दुसऱ्या आरोपीने फिर्यादीचे खिशातील पर्स व पर्स मधील एकूण 4500 रूपये असे एकुण 9500 रुपयेचा मुद्देमाल आरोपींनी फिर्यादीकडुन जबरदस्तीने हिसकावून घेऊन तिथून पळ काढला, असे फिर्यादीत नमुद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक मदेवाड हे करत आहेत.

अधिक वाचा –

– सोमाटणे टोलनाका हटवा..! कृती समितीकडून 9 मार्चला संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर बंदची हाक
– महिला दिन विशेष – मावळची ‘सुवर्ण कन्या’ तृप्ती शामराव निंबळे, शेतकऱ्याची पोरगी चॅम्पियन बनली अन् तालुक्याची मान अभिमानाने उंचावली


Previous Post

धक्कादायक! मुळशी तालुक्यातील नामांकीत पैलवानाचा तालमीत सराव करत असताना हार्ट अटॅकने मृत्यू

Next Post

महिला दिनाचा योग; शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर बिनविरोध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shilatne-Gram-Panchayat-Maval

महिला दिनाचा योग; शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : कर वसुलीसाठी तळेगाव नगरपरिषदेची विशेष मोहीम ; मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी शासनाची ‘अभय योजना’

February 13, 2026
As many as 13 Phipson's Shieldtail snakes were found in a polyhouse in Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील एका पॉलीहाऊसमध्ये आढळले तब्बल १३ ‘फिप्सन्स शील्डटेल’ (खापरखवल्या) साप

February 13, 2026
Maval Legislative Assembly Election Police route march in Talegaon Dabhade

महत्वाची बातमी ! पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा सविस्तर

February 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.