व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्रात आता महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत, योजनेची अमंलबजावणी सुरू

दिनांक 17 मार्चपासून म्हणजे आजपासून (शुक्रवार) राज्यात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत योजना अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 17, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
Discount-On-ST-Bus-Tickets-For-Women

Photo Courtesy : Twitter / CMO


महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प दिनांक 9 मार्च (गुरुवार) रोजी राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यावेळी फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत असेल, अशी घोषणा केली होती.

त्यानुसार आता दिनांक 17 मार्चपासून म्हणजे आजपासून (शुक्रवार) राज्यात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत योजना अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ( Women Will Get 50 Percent Discount On All Types Of ST Bus Ticket Fare In Maharashtra Shinde Fadanvis Govt Scheme Implementation Started )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात महिला सन्मान आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.

महिला सन्मान योजना pic.twitter.com/qIE9WsRJQU

— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) March 17, 2023

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून “मोफत” प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.

अधिक वाचा –

– येळसे गावात वीज कोसळून जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक, अवकाळी पावसामुळे पवनमावळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
– मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आढे गावाच्या हद्दीत अत्यंत भीषण अपघात, तीन जण जागीच ठार


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! तळेगाव दाभाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्म’हत्या, परिसरात खळबळ

Next Post

मावळात खेळ रंगला महिलांचा, वैष्णवी रसाळ ठरल्या सौभाग्यवती 2023 च्या मानकरी, विजेत्यांना मिळाली भरघोस बक्षिसे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Khel-Rangala-Mahilancha-In Maval-Taluka

मावळात खेळ रंगला महिलांचा, वैष्णवी रसाळ ठरल्या सौभाग्यवती 2023 च्या मानकरी, विजेत्यांना मिळाली भरघोस बक्षिसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.