व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या लोकप्रिय आमदारावर स्वतःच्या जन्मदात्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 12, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश
NCP-Party-Flag

File Image - NCP Party


महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर त्यांच्या वडीलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. क्षीरसागर यांच्या कौटुंबिक वादाने पोलिस स्टेशनची पायरी गाठली असून आमदार संदीप क्षिरसागर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी केला आहे. नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडला. याबाबत रविंद्र क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ( fir against ncp mla sandeep kshirsagar for assaulting his father ravindra kshirsagar beed news )

कौटुंबिक वादातील कारणातून, ‘संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांनी आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि माझ्यासह माझ्या बहिणींना घराबाहेर हाकलून दिले’, असे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. यावरुन संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरले हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आमदार संदीप क्षीरसागर यांचा परिचय…

आमदार संदीप क्षीरसागर हे क्षीरसागर कुटुंबातील उभरते नेतृत्व आहे. आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. संदीप क्षीरसागर यांनी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात ते जिंकले. यात त्यांनी त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता.

अधिक वाचा –
– वाचन वेड संस्था आणि अभंग प्रतिष्ठानकडून मावळ तालुक्यातील 40 शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके वाटप
– मोरवे शाळेत हस्तकला कार्यशाळा संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम


Previous Post

मोरवे शाळेत हस्तकला कार्यशाळा संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम

Next Post

लोणावळा शहरात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ उत्साहात; पद यात्रेत भाजपासह अन्य पक्षांचे कार्यकर्तेही सामील

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Savarkar-Gaurav-Yatra-Lonavala

लोणावळा शहरात 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा' उत्साहात; पद यात्रेत भाजपासह अन्य पक्षांचे कार्यकर्तेही सामील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.