व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील प्रलंबित कामांबाबत कृती आराखडा तयार करुन प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 4, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Jal-Jeevan-Mission

Photo - Jal Jeevan Mission


जल जीवन मिशन या केंद्रशासनाच्या महत्वकांक्षी योजनेत पुणे जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत; त्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित कामांबाबत कृती आराखडा तयार करुन प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालय इथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ( Complete works under Jal Jeevan Mission in Pune district on mission mode said Collector Rajesh Deshmukh )

“जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असून केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे करावीत. संबंधित अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी करावी. मान्सूनच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत.”

“अभियानातील कामांसाठी जलसंपदा, महसूल, वन, रेल्वे, आणि इतर विभागाकडील जागेच्या प्रलबिंत भूसंपादनाचे प्रस्ताव मार्गी लावावेत. प्रलंबित सरकारी जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी लवकरात लवकर पाठवावे. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे,” अशा सूचनाही राजेश देशमुख यांनी दिल्या.

हेही वाचा – वडार समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची 8 मे रोजी पिंपरीमध्ये जाहीर सभा

“पुणे जिल्ह्यात 1 हजार 224 पाणीपुरवठा योजना मंजूर असून 1 हजार 136 योजनांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. 1 हजार 21 योजनांची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकल्पाअंतर्गत रस्ते आदी कामे सुरु असून पाणीपुरवठा योजनांची कामे करताना या बाबीचाही विचार करावा. कामे करतांना प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करावा. कंत्राटदारांनी मे महिन्याअखेर दिलेली कामे पूर्ण करावीत. याकरीता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा,” अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

अधिक वाचा –
– मावळमधील कोथूर्णे इथे 6 मे रोजी राज्यस्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषद, वाचा सविस्तर
– श्री विठ्ठल परिवार मावळ व सकळ दिंडी नियोजन समिती यांकडून कान्हे इथे बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या


Previous Post

वडार समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची 8 मे रोजी पिंपरीमध्ये जाहीर सभा

Next Post

बाळा भेगडेंसह मावळ तालुक्यातील ‘या’ दोन भाजपा पदाधिकाऱ्यांचीही प्रदेश कार्यकारिणीत निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Bjp-Bala-Bhegade

बाळा भेगडेंसह मावळ तालुक्यातील 'या' दोन भाजपा पदाधिकाऱ्यांचीही प्रदेश कार्यकारिणीत निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.